कोपरगावात बिबट्यांचा वाढता उच्छाद; जनता दरबार केवळ फार्स-सौ स्नेहलता कोल्हे
Increasing number of leopards in Kopargaon; Janata Darbar only has Persian-Sau Snehalata kohle
“बिबट्यांचे हल्ले,लोकप्रतिनिधी खुर्चीत, जनता भीतीत!”
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sat1Nov 20.10 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :“कोपरगावात बिबट्यांची संख्या इतकी वाढली आहे की, आता ते कुत्र्याच्या पिलावळीसारखे गावोगावी फिरतात, आणि प्रशासन मात्र ‘मीटिंग’च्या आड झोपलंय!” असा जोरदार हल्लाबोल माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव तालुक्यात बिबट्यांचे फेरफटके वाढले आहेत. नुकत्याच घडलेल्या घटनेत साधनाताई बाबर या महिलेवर बिबट्याने हल्ला करून त्यांना गंभीर दुखापत केली या घटनेच्या वेळी २५ हून अधिक लोक उपस्थित होते परंतु प्रत्यक्ष बिबट्याला रोखण्याचे धैर्य मुलाने दाखवलं, मुलाच्या प्रसंगावधानामुळे आईचा जीव वाचला.“त्या मुलाने जे केलं ते धैर्याचं उदाहरण आहे; साधनाताई बाबर यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत याची माहिती मिळताच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी रुग्णालयात ग्रामीण रुग्णालयात जाऊन साधनाताई बाबर यांची विचारपूस केली त्यावेळी त्यांनी वनविभागाच्या निष्क्रितेवर संताप व्यक्त केला, प्रशासन फक्त दाखवायचे काम करीत असल्याचा टोला कोल्हे यांनी लगावला.

“जनता दरबारात हा प्रश्न किती वेळा मांडला! पण वनविभाग आणि लोकप्रतिनिधी दोघेही ‘तीन बीट, ३६ गावं, पाच पिंजरे’ या जुन्या गोष्टीवर अडकलेत. एवढ्या क्षेत्रासाठी पाच पिंजरे म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळ करणं नाही का?” असं कोल्हे म्हणाल्या.
त्यांनी संताप व्यक्त करताना पुढे म्हटलं, “लोकप्रतिनिधीचा जनता दरबार केवळ फार्स ठरला आहे.प्रत्यक्ष कृती होताना मात्र दिसत नाही जनतेच्या सुरक्षिततेचा प्रश्न आला की सगळ्यांना मुग गिळून बसायला होतं. बिबट्यांपेक्षा धोकादायक म्हणजे ही निष्क्रिय यंत्रणा!”
शेवटी कोल्हे यांनी इशारा दिला, “आता जनता शांत बसणार नाही. जर तातडीने कारवाई झाली नाही, तर आम्हीच रस्त्यावर उतरू. बिबट्यांना नाही, तर निष्क्रिय लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना आता जनतेच्या पिंजऱ्यात उभे करण्याची वेळ आली आहे!”
यावेळी अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गुट्टे, डॉ. कृष्णा फुलसुंदर, डॉ. संजय उंबरकर, डॉ. अतिश काळे, डॉ. सुजाता ढिकले मॅडम, तसेच वनरक्षक अमोल किनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Post Views:
119





