गणेश कारखाना राजकारणाच्या नव्हे सहकाराच्या बळावर उभा आहे; विवेक कोल्हे 

गणेश कारखाना राजकारणाच्या नव्हे सहकाराच्या बळावर उभा आहे; विवेक कोल्हे 

Ganesh Karkhana stands on the strength of cooperation, not politics; Vivek Kolhe

विरोधकांच्या अडथळ्यांवर मात; गणेश कारखान्याचा तिसरा गाळप हंगाम उत्साहात सुरू

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sat1Nov 20.20 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव :“राजकारण नको, सहकारच प्रधान!” असा संदेश देत सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचा २०२५-२६ चा ऊस गाळप हंगाम शुभारंभ गव्हाणीत उसाची मोळी टाकून  केला.

या वेळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महंत रामगिरीजी महाराज, माधवीताई गुरुगोदावरी, संचालक मंडळ, सभासद व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महंत रामगिरीजी महाराज म्हणाले, “गणेश विघ्नहर्ता आहे; हा हंगाम निर्विघ्न पार पडो, अशी प्रार्थना गणेशाच्या चरणी करूया.”

आशीर्वाद देताना महंत रामगिरीजी महाराज म्हणाले की, “श्री गणेशाच्या कृपेने हा गळीत हंगाम निर्विघ्नपणे पार पडेल, अशी आपण सर्वांनी गणेशाच्या चरणी प्रार्थना करूया. कारखान्यासमोरील अडचणी हळूहळू कमी होत चालल्या आहेत. या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी व्यवस्थापनाचे प्रयत्न सुरू आहेत. गणेश कारखाना या अडचणींवर मात करून निश्चितपणे यशस्वीपणे चालेल, असा विश्वास वाटतो.

विवेक कोल्हे म्हणाले, “नगर जिल्हा सहकार परंपरेचा आदर्श आहे. स्व. शंकरराव कोल्हे, काळे साहेब, विखे पाटील, थोरात यांनी सहकारात राजकारण आणले नाही; आम्हीही तीच परंपरा जपत आहोत.”

पहिल्या दोन हंगामात कर्ज नाकारले गेले, तरी संजीवनी समूह व बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्याने कारखाना सुरू ठेवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने ७४ कोटींचे कर्ज मंजूर झाले. यंदा ३ ते ३.३ लाख टन ऊस क्रशिंगचे उद्दिष्ट ठेवले असून डिस्टिलरी प्रकल्प सुरू करण्याचा मानस आहे.

“कर्मचारी हे कारखान्याचे आत्मा आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळेच गणेश उभा आहे. विक्रमी ११ टक्के बोनस देऊन कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली,” असे कोल्हे म्हणाले.

विरोधकांवर निशाणा साधत ते म्हणाले, “संस्थेच्या कामकाजात कोणी आडवा येत असेल तर त्यालाही आम्ही आडवे गेल्याशिवाय राहणार नाही. गणेशाची सोंड फिरली की चांगल्या चांगल्याचा कार्यक्रम होतो!”

शेतकऱ्यांना आवाहन करत त्यांनी सांगितले, “कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून उत्पादन वाढवा, पाण्याची बचत करा. फूड प्रोसेसिंग व मका- सोयाबीन प्रकल्प सुरू करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवू.”

अध्यक्ष सुधीर लहारे म्हणाले, “विरोधकांच्या दबावात न येता विवेक कोल्हे यांनी कारखान्याचा रथ चालवला आहे. सहकार क्षेत्रात ते आशेचा किरण आहेत.”

Leave a Reply

You cannot copy content of this page