काम सुरू झालं की पूर्णही झालं पाहिजे!” — आ. आशुतोष काळे यांचा ठेकेदारांना इशारा
Once the work starts, it must be completed!” — MLA Ashutosh Kale’s warning to contractors
रस्त्यांच्या कासवगती कामांवर आमदार काळेंचा थेट दम; पंधरा दिवसांत अडचणी दूर करण्याचे ठेकेदारांचे आश्वासन
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Tue4Nov 17.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत ठेकेदारांना चांगलाच दम दिला. बैठकीत ठेकेदारांनी “पंधरा दिवसांत वाहतुकीवरील अडचणी दूर करू” असे आश्वासन दिले. यावर आमदार काळे म्हणाले, “काम सुरू झालं की पूर्णही झालं पाहिजे, नाहीतर जबाबदारी ठरवली जाईल!” असा स्पष्ट इशारा दिला.
कोपरगाव मतदारसंघात सावळीविहीर–कोपरगाव राष्ट्रीय महामार्गासाठी १९१ कोटी आणि देर्डे फाटा–भरवस फाटा राज्य मार्ग ७ साठी तब्बल २३२ कोटी रुपये निधी आमदार काळेंनी मंजूर करून घेतला आहे. तरीही कामांचा वेग अत्यंत मंद आहे. यामुळे नागरिकांची सहनशक्ती संपत चालली असल्याचे आमदार काळे यांनी बैठकीत अधोरेखित केले.
ते पुढे म्हणाले, “परतीच्या पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. ऊस हंगाम सुरू होत असल्याने वाहतुकीची गर्दी वाढेल. लोकांना त्रास होऊ नये म्हणून सर्व विभागांनी समन्वय साधून कामे लवकर पूर्ण करा.”
आमदार काळे यांनी पुणतांबा फाटा–कोपरगाव रस्त्यावर समृद्धी महामार्गाजवळील खड्ड्यांची त्वरित दुरुस्ती, सीडी वर्क सुरू करणे आणि निचऱ्याची सोय करण्याचे आदेश दिले. मंजूर असूनही सुरू न झालेली कामे तातडीने हाती घ्यावीत, असेही निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीला कार्यकारी अभियंता एस.आर. वर्पे, उपअभियंता वर्षराज शिंदे, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी ए.एल. जमाले, कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
Post Views:
102





