कोल्हेंचा ‘थांबलेला डाव’ : नऊ जागांमागे कोणती नवी कूटनीती?
The Kohles ‘Standing Off’: What New Diplomacy Behind the Nine Seats?
२१ उमेदवार जाहीर; उर्वरित नऊ जागा थांबवून विवेक कोल्हेंच्या राजकीय चातुर्याची झलक
“नऊ जागा राखून कोल्हेंनी पुन्हा रंगवला राजकीय बुद्धिबळाचा पट; कुणाचा पत्ता थांबला, कुणाचं गणित बिघडलं?”
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Wed 12Nov 11.20Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: विवेक कोल्हे यांनी ३० पैकी २१ उमेदवार जाहीर करून राजकीय मैदानात आघाडी घेतली असली, तरी नऊ जागा राखून ठेवून त्यांनी पुन्हा एकदा कूटनीतीचा डाव रंगवला आहे. अडचणी नसतानाही या जागा थांबवण्यामागे नेमकं कोणतं गणित आहे, याबद्दल तर्कवितर्क सुरू आहेत. आंतरिक तोल राखणे आणि भावी समीकरणांसाठी जागा उघडी ठेवणे, हेच या रणनीतीचं केंद्रबिंदू असल्याचं जाणकारांचं मत. एकूणच, कोपरगावच्या राजकारणात कोल्हेंचा हा थांबलेला डाव नव्या चर्चेचा विषय ठरला आहे.
कोपरगाव शहराच्या राजकारणात पुन्हा एकदा कोल्हे परंपरेचा राजकीय डावपेच झळकताना दिसतो आहे. विवेक कोल्हे यांनी ३० पैकी २१ उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली असली, तरी नऊ जागा जाणीवपूर्वक थांबवून ठेवत त्यांनी राजकीय पटावर नवा प्रश्नचिन्ह उभा केलं आहे. हा निर्णय निव्वळ वेळकाढूपणाचा नसून, आगामी समीकरणांचा पूर्वाभास असल्याचं स्पष्ट होत आहे.
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, या नऊ जागांमध्ये फारसा वाद नाही. असा पक्षांतर्गत सूत्रांचा दावा आहे. मगही त्या रिक्त का ठेवण्यात आल्या, हा प्रश्न सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.“कोल्हे हे निर्णय घेताना तीन पावलं पुढचं विचार करतात. त्यामुळे या जागा फक्त उमेदवार ठरवण्यासाठी नाहीत, तर भविष्यातील समीकरणांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत का? ,” तरीसुद्धा त्या राखून ठेवण्यामागे कोल्हेंचा दूरगामी राजकीय हिशेब दडलेला असल्याचं जाणकार सांगतात. “कोल्हेंचं प्रत्येक पाऊल नियोजनबद्ध असते. नऊ जागा थांबवणं म्हणजे उमेदवारांचा नव्हे, तर भविष्यातील संबंधांचा विचार आहे,” असं एका ज्येष्ठ कार्यकर्त्याचं मत आहे.
आंतरिक तोल आणि बाह्य संदेश
या जागा थांबवून कोल्हेंनी एकाच वेळी दोन गोष्टी साधल्या-“पक्षातील असंतोष रोखला, आणि बाह्य पातळीवर राजकीय सौदेबाजीसाठी दरवाजे उघडे ठेवले.
“ही रणनीती म्हणजे थेट आक्रमण नव्हे, तर शह देऊन मात करण्याची कला आहे,” असं काही जण म्हणतात तर राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, या थांबवलेल्या जागांमागे दोन हेतू दिसतात —पहिला, पक्षांतर्गत गटबाजी शांत ठेवण्यासाठी काही जागा खुल्या ठेवणं, आणि दुसरा, भावी गठबंधनं किंवा स्थानिक राजकीय सौदेबाजीसाठी जागा राखून ठेवणं.“कोल्हेंनी कोणाला ‘डिस्टर्ब’ न करता, सर्वांना आपल्याशी जोडून ठेवायचं तंत्र अवगत केलं आहे. त्यामुळेच या नऊ जागा प्रतीकात्मक असल्या तरी त्यांचा राजकीय अर्थ खोल आहे,” असा एका विश्लेषकाचा दावा आहे.
विरोधकांत हालचाल, समर्थकांत शांतता
या अधुऱ्या यादीने विरोधकांत खळबळ उडाली आहे. “कोल्हे काहीतरी वेगळं आखत आहेत,” अशी चर्चा विरोधी छावण्यांत सुरू आहे. समर्थक मात्र आत्मविश्वासानं म्हणतात:“विवेक कोल्हेंच्या डावाचा शेवटच नेहमी विजयातच अर्थात जिंकून देतो.”
एकूणच, विवेक कोल्हे यांच्या या थांबलेल्या यादीने कोपरगाव शहराच्या राजकीय वर्तुळात नव्या तर्कवितर्काचा महापूर उसळवला आहे. नऊ जागांमागचं गणित पुढील काही दिवसांत उलगडेलच; पण तेवढ्यातच कोल्हेंच्या या रणनीतीने पुन्हा एकदा स्पष्ट केलंय की, कोपरगावच्या राजकारणात पत्ते कोणीही वाटू शकतात, पण खेळ व डाव नेहमी कोल्हेंचाच असतो
या नऊ जागांवर शेवटी कोल्हेंचं कोणत गुपित फोडलं जाणार, आणि कोणत्या दिशेनं कोपरगावच्या राजकारणाची गणितं फिरवली जाणार? उत्तर काहीही असो, कोल्हेंचा हा थांबलेला डाव, सध्या तरी सगळ्यांच्या मेंदूत शिरतोय. हे जरी खरे असले तरी आज राजकीय मैदानावर एकच चर्चा:“कोल्हेंचा हा थांबलेला डाव, नेमका कोणासाठी?”
Post Views:
29