“कोपरगावात राजकीय भूकंप! काका कोयटे ‘राष्ट्रवादी’च्या गोटात –

“कोपरगावात राजकीय भूकंप! काका कोयटे ‘राष्ट्रवादी’च्या गोटात –

“Political earthquake in Kopargaon! Kaka Koyte joins the ‘nationalist’ camp –

आमदार काळेंनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर; कोल्हे गटाचे गणित मोडीत!”

स्वराज्य संस्थेच्या तोंडावर ‘राजकीय स्फोट’ – एका काकांच्या प्रवेशानं कोपरगावातली समीकरणे उलथली; कोल्हे गटासमोर अस्तित्वाचा प्रश्न!

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Thu 13Nov 15.00Am.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव:कोपरगावात गुरुवारी सकाळी ११ वाजता कृष्णाई मंगल कार्यालयातून झालेला “राजकीय स्फोट” अद्याप शहराच्या हवेत घुमतो आहे. वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेले आमदार आशुतोष काळे यांनी अचानक काका कोयटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश जाहीर केला आणि त्याचवेळी नगराध्यक्ष पदासाठी त्यांचे नाव घोषित करताच संपूर्ण राजकीय पट हलला.हा प्रवेश म्हणजे केवळ एका नेत्याचा पक्षप्रवेश नाही तर कोपरगावच्या राजकारणातल्या दशकभराच्या स्थिर समीकरणांवर घातलेला बॉम्बस्फोट आहे!

कोल्हे गटावर थेट धडक

गेल्या निवडणुकांमध्ये कोल्हे गटाची एकछत्री सत्ता होती. पण आता “काका कोयटे” या नावानं त्या सत्तेच्या पायावर पहिला भूकंप घडवला आहे.
२००१ च्या निवडणुकीतील ३१ मतांच्या पराभवानंतरही कोयटे यांनी गावाशी नाळ तुटू दिली नाही. पतसंस्था, उद्योगसमूह, सामाजिक उपक्रम या सगळ्यातून त्यांनी सातत्याने आपली उपस्थिती जपली.
आज त्यांच्या त्या कष्टांची राजकीय फळं मिळाल्याचं दृश्य कृष्णाई मंगल कार्यालयात दिसलं – काळे यांनी उमेदवारी जाहीर करताच कार्यकर्त्यांच्या घोषणा कोल्हे गटाच्या छातीत काट्यासारख्या खुपल्या!

“कोल्हे गट झोपेत असतानाच काका उठले!”

काका कोयटे यांची वाटचाल धीम्या पण काटेकोर पद्धतीने चालली. कोल्हे गटातील तथाकथित “चाणक्य” यांना हे दिसलेच नाही.आज जेव्हा राष्ट्रवादीच्या बॅनरखाली त्यांचे नाव उमेदवार म्हणून झळकलं, तेव्हा कोल्हे गटातील बऱ्याच मंडळींनी फोन बंद करून घेतले, अशी राजकीय कुजबूज शहरात सुरू आहे.राजकीय निरीक्षकांचं मत सरळ आहे, “काकांच्या मनातील स्वप्न कोल्ह्यांच्या दुर्लक्षामुळे आता काळे यांच्या राजकारणातून सत्यात उतरतंय.”

काकांचा मनोदय : कोपरगाव ‘कोपटाऊन’ बनवण्याचा!

स्वतः काका कोयटे यांनी भाषणात स्पष्ट सांगितलं “आता माझं आयुष्य केवळ कोपरगावसाठी आहे.कोपरगावला ‘कोपटाऊन’ बनवायचं आहे.परदेशी गावांत धूळ नाही, मग कोपरगावात का असावी?” त्यांच्या आवाजातील आत्मविश्वास पाहून सभागृहात उपस्थित असलेले काळे गटाचे कार्यकर्ते थेट उभे राहून टाळ्या वाजवताना दिसले.

राजकीय भविष्य : उलथापालथ निश्चित

नगरपालिका निवडणूक अगदी तोंडावर असताना झालेला हा प्रवेश म्हणजे थेट राजकीय काटा बदलण्यासारखा आहे.
कोल्हे गटातील असंतुष्ट नगरसेवक, पदाधिकारी आता काळे गटाकडे वळतील, अशी शक्यता तज्ज्ञ वर्तुळातून व्यक्त केली जाते.
काकांच्या एन्ट्रीनं कोल्हे गटाचं गणित मोडलं, आणि काळे गटाचं गणित जुळलं”, अशी प्रतिक्रिया आज शहरभर उमटते आहे.

चौकट 

कोपरगावच्या राजकारणात गेल्या वीस वर्षांत असा “राजकीय भूकंप” झालेला नाही.काका कोयटे यांच्या प्रवेशानं आणि आ.काळे यांच्या रणनितीनं कोपरगावातील निवडणूक आता थेट “काळे विरुद्ध कोल्हे” अशा दोन ध्रुवांमध्ये विभागली गेली आहे.आता पाहायचं एवढंच कोणाची “सत्ता” जनता मान्य करते आणि कोणाचे “मनसुबे” कोसळतात!

Leave a Reply

You cannot copy content of this page