विवेक कोल्हेंचा ‘थांबलेला डाव’ की ‘नवा गेम प्लॅन’?
Vivek Kolhe’s ‘Stuck Innings’ or ‘New Game Plan’?
कोपरगावच्या राजकारणात पुन्हा उठलं वादळ; कोल्ह्यांची ही वादळापूर्वीची शांतता!
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Thu 13Nov 15.30Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : कोपरगावच्या राजकीय पटावर पुन्हा एकदा विवेक कोल्हेंनी शह-मातचं नवं समीकरण मांडलंय! ३० जागांपैकी २१ उमेदवार जाहीर करून उर्वरित नऊ जागा थांबवणं, हा फक्त विराम नव्हे, तो एक राजकीय संकेत आहे.
कोल्हेंनी हा डाव थांबवला नाही,तर ‘जाणूनबुजून अडवला’ आहे. कारण पुढचा खेळ अजून बाकी आहे!
कोयटेंचा प्रवेश : ‘शह’ की ‘आमिष’?
काका कोयटे आमदार काळे यांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले, आणि कोपरगावच्या पटावर नवा वारा वाहू लागला.राष्ट्रवादीत उत्साहाचं वारेमाप वातावरण, पण त्याचवेळी कोल्हे गोटात अजब शांतता!ही शांतता म्हणजे हार मानलेली नव्हे, तर वादळापूर्वीची शांत झुळूक आहे.
राजकीय जाणकारांचं निरीक्षण असे आहे की “कोल्हेंनी जागा थांबवल्या नाहीत, त्यांनी ‘संधी’ राखून ठेवल्या आहेत.पुढच्या चालीचं गणित अजून त्यांच्याच हातात आहे!”
नऊ जागा ; दबाव की ‘ऑफर’?
या नऊ जागा म्हणजे कोल्हेंचा ‘सिग्नल बोर्ड’!कोणी येणार, कोणी जाणार हे ठरवणं आता कोल्हेंच्या ‘इशाऱ्यावर’ आहे.एका बाजूला असंतोषित कार्यकर्त्यांना धीर आणि संकेत,तर दुसऱ्या बाजूला संभाव्य मित्रपक्षांना आमंत्रण आणि सौदेबाजी! राजकीय सूत्रांचं म्हणणंआहे की,“कोल्हे अजूनही ‘किंगमेकर’आहेत.शह-मातचं गणित ते एकट्याने ठरवतात.”
राष्ट्रवादी उत्साही, कोल्हे ‘सज्ज पण शांत’
कोयटेंच्या-काळे गटातील प्रवेशानं राष्ट्रवादीत स्फूर्ती आली आहे; पण कोल्हेंचा गट ‘न बोलता तयारी’ करत आहे.कोणीही नजरेआड झालं नाही, प्रत्येक हालचालीवर नजर आणि प्रत्येक निर्णयात गणित आहे.आतल्या मंडळीत चाचपणी सुरू आहे .कोणावर विश्वास ठेवायचा, कोणाला थांबवायचं, आणि कोणाला गोटात खेचायचं. कारण कोल्हेंची रणनीती एकच “सगळ्यांना खेळायला द्या, पण शेवटचा शह माझाच असेल!”
‘कोल्हे पॅटर्न’ उतरलाय मैदानात
राजकीय पटावर “कोल्हे पॅटर्न” म्हणजे शांततेतून वादळ उठवणं,आणि त्याच पद्धतीनं विवेक कोल्हेंनी पुन्हा आपल्या शैलीत ‘रिव्हर्स प्लॅन’ खेळायला सुरुवात केलीय. काहींना सोबत घेण्याचं नाटक, काहींना बाजूला ठेवण्याचं गणित पण शेवटी खेळ कोल्हेंच्या पद्धतीनंच संपणार!
कोयटे राष्ट्रवादीत गेले, पण कोल्हेंनी अजून शेवटचा मोहरा उचललेलाच नाही.पुढे तो कुठे बसवतात. हेच ठरवणार कोपरगावचं राजकीय भवितव्य.कारण, विवेक कोल्हे थांबत नाहीत. ते वेळ बघतात.आणि हीच त्यांची खरी ओळख!
चौकट
कोपरगावात आता रणांगण सज्ज आहे.एका बाजूला कोयटे-काळेंचा उत्साह, दुसरीकडे कोल्हेंची शांत रणनीती.“थांबलेला डाव” ही केवळ संज्ञा नाही; ती एक राजकीय खेळी आहे जिथे प्रत्येक चाल विचारपूर्वक रचली जाते.आता सगळ्यांचं लक्ष फक्त एका गोष्टीकडे“कोल्हे कोणत्या क्षणी ‘शह-मात’ देतात?”
Post Views:
158