“कोयटेंची उमेदवारी कोपरगावच्या स्वाभिमानावर बाहेरचं मांडलिकत्व; विवेक कोल्हेंचा हल्लाबोल !
“Koyte’s candidacy is an external threat to the self-respect of Kopargaon; Vivek Kolhe’s attack!”
“बाहेरून लादलेलं नेतृत्व कोपरगाव मान्य करणार नाही; ही निवडणूक विकासाची नव्हे, स्वाभिमानाची” गुलाल तर आमचाच !
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Thu 14Nov 9.00Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : कोपरगावच्या राजकारणात पुन्हा एकदा धुराळा उडाला! काका कोयटे राष्ट्रवादीच्या काळे गटात दाखल झाल्यानंतर भाजपच युवानेते विवेक कोल्हेंनी पत्रकार परिषदेत थेट आणि घनाघाती हल्लाबोल केला. गुरुवारी (१३) सायंकाळी साडेसात वाजता संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नाव न घेता पण बोट दाखवून “तालुक्याबाहेरील आकाचा खेळ आणि इथल्या आमदाराच्या मांडलिकत्वाचं राजकारणाचा पर्दाफाश केला”
“एका तरुणाचं वाढतं नेतृत्व काहींना खूपलं. म्हणूनच तालुक्याबाहेरील “आकानी काकांची’ उमेदवारी पक्की केली. कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून लादलेला उमेदवार आणणं ही स्व:पक्षाच्या व कोपरगावच्या स्वाभिमानाची गळचेपी आहे,” असा जोरदार प्रहार कोल्हेंनी केला.
त्यांनी पुढे घणाघाती सवाल केला “पन्नास वर्ष कोपरगावची धूळ न पाहणाऱ्या काकांना अचानक विकासाची भाषा का सुचली? हीच का त्यांची जनतेशी नाळ? कोपरगावकरांना फक्त मोठ्या मोठ्या कामांना येणार असे म्हणणारा हेलिकॉप्टर उमेदवार नको, त्यांना रात्री दोन वाजता देखील फोन उचलणारा लोकांचा माणूस हवा!““आज ७६ वर्षांचे आणि पुढच्या पाच वर्षांत ८१ पार करणाऱ्या उमेदवाराकडून विकासाचा वेग नव्हे, तर थकवा मिळणार आहे. कोपरगावचं भविष्य तरुणाई घडवणार भूतकाळ नव्हे! ही जनता वृद्धत्वाकडे झुकलेल्या नेतृत्वाला नव्हे, नव्या उमेदीच्या नेतृत्वाला संधी देणार आहे,” त्यांच्याकडे संदीप कोयटेसारखा युवक होता असा इशारा देखील कोल्हेंनी केला.
कोल्हेंनी काळे गटाच्या कामगिरीवर थेट टीका करताना म्हटलं “पाणीप्रश्न सुटल्याचा डांगोरा पिटतात; पण वास्तवात वर्षातून फक्त ७२ दिवस पाणी दिलं जातं, आणि दिवसाचा खर्च एक लाख! हा प्रचंड भ्रष्टाचार नाही का? चार वर्षे नगरपालिका प्रशासक व आमदार यांच्या ताब्यात होती; मग कोणी प्रश्न विचारला का?” काकांनी याचं आत्मचितन करण्यास काहीच हरकत नाही
विकासाच्या भाषेवर प्रत्युत्तर देताना ते म्हणाले,“कोपरगाव बसस्टँड, तहसील, फायर स्टेशन, न्यायालय, पंचायत समिती,नगरपालिका या सर्व इमारती कोल्हे ताईंच्या कालखंडात झाल्या. हे विरोधकही मान्य करतात. मग आज अचानक ‘विकासाचा शोध’ घेणाऱ्या लोकांची विकासाशी बांधिलकी कुठे होती?”
त्यांनी पक्षातील उमेदवारांबाबत स्पष्ट भूमिका मांडली “आमचे २१ उमेदवार एक गेला २० उमेदवार ठाम आहेत. कुठलीही नाराजी नाही. आम्ही कार्यकर्त्यांना न्याय दिला आहे, युवकांना संधी दिली आहे. आम्ही लोकांमध्ये राहतो, त्यांच्या दु:खात उभे राहतो. पण काहीजण वैयक्तिक स्वार्थासाठी तालुक्याबाहेरील शक्तींसमोर नतमस्तक झाले.” टोला देखील लगावला.
कोल्हेंनी पुन्हा ‘बाहेरील हस्तक्षेप’ या मुद्द्यावर आक्रमक होत म्हटलं “२००४ आणि २००९ मध्येही बाहेरील शक्तींचा हस्तक्षेप झाला आणि त्याचे दुष्परिणाम कोपरगावने भोगले. दहा वर्ष सभागृहात एकही प्रश्न न विचारणारे आमदार निवडून आले. ही जनता विसरलेली नाही.”
पत्रकार परिषद संपताना कोल्हेंचा आवाज ठाम आणि आत्मविश्वासाने भरलेला होता “ही निवडणूक विकासाची नाही, ही स्वाभिमानाची आहे. बाहेरून लादलेलं मांडलिकत्व कोपरगावकर कधीच स्वीकारणार नाहीत. येत्या ३ तारखेला स्वाभिमानाचाच विजय होईल आणि आम्हीच गुलाल उधळू!”
यावेळी पत्रकार परिषदेसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान, पार्लमेंटरी बोर्डाचे दिलीप दारूणकर, केशवराव भवर, नारायण शेठ अग्रवाल, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, रवींद्र पाठक, संजय सातभाई, बबलू वाणी आदी उपस्थित होते





