BJP victory in Bihar… Rain of flowers in Kopargaon! Snehlata Kolhe’s jubilant speech”
छत्रपती शिवरायांना वंदन करून शहरभर आनंदसोहळा; ‘मोदी–शहा यांच्या नेतृत्वावर देशाचा अढळ विश्वास’ – माजी आमदार स्नेहलता कोल्हे
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Fir 14Nov 20.10Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : बिहार निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर कोपरगाव भाजपमध्ये जल्लोषाचा स्फोट! सायंकाळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन भाजप पदाधिकाऱ्यांनी शहरातील मुख्य रस्त्यावर व्यापाऱ्यांना पेढे वाटत विजयाचा सोहळा रंगवला.
यावेळी बोलतांना स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, “बिहारने पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर, अमित शाहांवर आणि एनडीएच्या नेतृत्वावर अढळ विश्वास ठेवून ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मंत्रावर शिक्कामोर्तब केले आहे.देशाचे भविष्य, देशाची सुरक्षितता आणि स्थिर नेतृत्व यावर जनतेचा ठाम विश्वास आहे. म्हणूनच हा प्रचंड विजय घडला.”
त्या पुढे म्हणाल्या, “जागतिक पातळीवर युद्धसदृश तणाव निर्माण झाला तरी भारत एकजुटीने उभा राहिला. हिंदू–मुस्लिम दंगली नाहीत, पाकिस्तानला दिलेला ठोसा आणि देशाची एकसंघता—यावर जनता खूश आहे. बिहारी मतदारांनी दाखवलेला विश्वास म्हणजे मोदी साहेबांवरील आस्था आहे. महाराष्ट्रातही तीच लाट दिसते.”
कोपरगाव भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या अक्षरशः उत्साहाचा धडाका असून पेढ्यांचा वर्षाव, ढोल-ताशांचा गजर, “मोदी आहे तोपर्यंत… काहीही अशक्य नाही!” अशा घोषणा सुरूच होत्या.
महानगरपालिका निवडणुकीतील निकालातही बिहारी मतदारांनी दाखवलेला विश्वास महाराष्ट्रात उमटेल, असा ठाम विश्वास माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केला