कोपरगावात सत्तानाट्याचा स्फोट!चार दशकांचे ‘शिवसेनेचे नेते’ राजेंद्र झावरे यांचा अचानक राजीनामा!
Power play explodes in Kopargaon! Rajendra Zaware, a four-decade-old ‘Shiv Sena leader’, suddenly resigns!
उत्तर नगर जिल्ह्यात राजकीय वादळ; पालिका रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर मोठा उलटफेर?
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Fir 14Nov 20.40Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चा उत्तर नगर जिल्ह्यातील सर्वात निष्ठावंत, खंदा आणि लढवय्या चेहरा… राजेंद्र मुरलीधर झावरे यांनी सह-संपर्क प्रमुख पदाचा आज अचानक राजीनामा देताच जिल्हाभरात थरकाप उडवणारे राजकीय वादळ उठले आहे. कोपरगावात गेल्या ४० वर्षांत इतका तीव्र राजकीय धक्का कधीच बसलेला नव्हता!
चार दशकांपासून एकही पदाची लालसा न बाळगता, प्रस्थापित घराण्यांच्या दांडगाईला न घाबरता त्यांनी शिवसेनेला कोपरगावात घराघरात नेले.नगर जिल्ह्यात जिथे शिवसेनेचा ठसा क्षीण होता, तिथे कोपरगाव हा शिवसेनेचा एकमेव अड्डा म्हणून जिवंत ठेवण्याचे श्रेय झावरे यांच्याकडेच जाते.
शिंदे बंडाच्या काळातही ढळणार नाही अशी निष्ठा – झावरे ठाम उभे!
शिवसेना दोन तुकड्यांत फुटली, अनेक जणांनी बंडाचा मार्ग धरला… पण झावरे मात्र अडिग!अनेक ऑफर, प्रचंड दबाव, राजकीय प्रलोभने, सर्व काही नाकारत त्यांनी कोपरगावात उद्धव ठाकरेंवरील निष्ठा अबाधित ठेवली.त्यामुळे कोपरगावात बंडाचे काटे उगवलेच नाहीत.
मात्र आजचा राजीनामा… पक्षासाठी ‘रेड अलर्ट!’
झावरे यांचा अचानक राजीनामा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी मोठा झटका.शिवसैनिक एकच प्रश्न विचारताहेत “जो नेता चार दशकं ढळला नाही… तो अचानक का हादरला?”
कार्यकर्त्यांपासून जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात शंभर चर्चा काय नाराजी? कोणाचा दबाव? कोणत्या बाजूला जाणार?
पालिका निवडणुका दारात, झावरे पुढची चाल कोणती?
कोपरगाव महापालिका रणशिंग वाजायला काही महिनेच उरलेले… अशावेळी झावरे यांचा राजीनामा म्हणजे सरळ सरळ राजकीय समीकरणं कोलमडवणारा ‘गेंमतोड’ निर्णय!
झावरे कोणत्या पक्षाकडे झुकतात?
स्वतंत्र पॅनेल उभा करणार? की कोपरगावात नवा राजकीय गठबंधन साकारणार? यामुळे कोपरगाव–नगर जिल्ह्याचा राजकीय पट पुन्हा ढवळून निघण्याची चिन्हं स्पष्ट दिसू लागली आहेत एकच गोष्ट निश्चित — झावरे यांच्या पुढील पावलाने कोपरगावात प्रचंड राजकीय स्फोट होणार!
Post Views:
58