कोपरगावात झावरेंचा ‘धनुष्यबाण’ धडाका; नगराध्यक्ष पदाची लढत तापणार !

कोपरगावात झावरेंचा ‘धनुष्यबाण’ धडाका; नगराध्यक्ष पदाची लढत तापणार !


Jhavaren’s ‘bow and arrow’ explodes in Kopargaon; The race for the post of mayor will heat up!

शिंदे सेनेत अचानक झावरे + जाधव  मोठी “डबल एन्ट्री” 

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sat 15Nov 20.00Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव : कोपरगावच्या राजकारणात आज अक्षरशः गडगडाट झाला! अनेक वर्षे ठाकरे गटात निष्ठेने काम केलेले माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र मुरलीधर झावरे यांनी कालच राजीनामा पाठवला आणि आज शिंदे सेनेच्या धनुष्यबाणावर नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल करताच राजकीय पट उलथापालथ झाला. शहरात “हे काय घडलं?” असा मोठा प्रश्न थेट उभा राहिला.

झावरेंसोबत जिल्हाप्रमुख नितीन औताडे उपस्थित होते, आणि अर्ज भरताच शहरात चर्चेचा धुरळा उडाला. लोकांच्या तोंडी एकच चर्चा,“झावरे शिंदे गटात? मग ठाकरे गटाचं पुढं काय?”समर्थकांच्या प्रतिक्रिया थेट, बोचऱ्या-“झावरे उतरल्यावर खेळच बदलला!”,“धनुष्यबाण आता धडधडणार!”‌अशा शब्दांत वातावरणातली ताणलेली हवा स्पष्ट जाणवत होती.

चार पक्ष आमनेसामने – लढत रंगणार 

अपक्ष बाजूला ठेवले तर कोपरगावात आता थेट चौकोनी लढत तयार—शिंदे सेना – ठाकरे सेना – भाजप – राष्ट्रवादी (शरद पवार गट). झावऱेंच्या प्रवेशाने शिंदे गटाला अचानक अतिरिक्त वजन मिळाले आहे. तर ठाकरे गटात अंतर्गत अस्वस्थता आणि समीकरणे ढासळल्याचे बोलले जात आहे.

५० वर्षांची मैत्री – जाधवांचाही राजीनामा, स्फोट दुप्पट!

सगळ्यांत मोठा धक्का म्हणजे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव यांनी ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत धनुष्यबाण हाती घेतला. मुलाच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय शहरभरात चर्चेचा विस्फोट ठरला आहे.

झावरे–जाधव ही ५० वर्षांची मैत्री आता शिंदे सेनेला मिळालेली ‘डबल पॉवर’ मानली जात असून, अनेक प्रभागांत या दोघांचा संयुक्त प्रभाव पुढच्या काही दिवसांत स्पष्ट दिसेल, अशी चर्चेला जोर.

शहरात तापमान वाढलं—पुढचा डाव कोणाचा?

कोपरगावचं राजकीय व्यासपीठ आता पूर्ण तयारीत,नेत्यांचे अचानक वळण, नव्या जुळवाजुळी, तळातून हलणारी समीकरणं…
यामुळे आगामी दिवस आणखी स्फोटक ठरणार हे निश्चित!कोणाचं गणित जुळणार?कोणाचा पत्ता कट होणार? आणि सर्वात महत्त्वाचं—आता कोण कुणाच्या गोटात जाणार? याकडे कोपरगावच्या प्रत्येक राजकीय घराची नजर खिळली आहे.

झावरेंचा ठाम सूर—“नगराध्यक्षपद नसेल तर चर्चा नाही!”झावरे म्हणाले—“अनेक आमिषे देण्यात आली, तडजोडींची भाषा झाली. पण स्पष्ट सांगितलं,नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली तरच बोलणी, नाहीतर सरळ निवडणूक! आता कोणाशी चर्चा नाही.”

Leave a Reply

You cannot copy content of this page