कोपरगावात ‘मशाल’ तेजोमय – सपना मोरे मैदानात; शिवसेनेचा आत्मविश्वास शिगेला!

कोपरगावात ‘मशाल’ तेजोमय – सपना मोरे मैदानात; शिवसेनेचा आत्मविश्वास शिगेला!

‘Torch’ shines brightly in Kopargaon – Sapna More in the field; Shiv Sena’s confidence is at its peak!

निष्ठेच्या पावतीवर उमेदवारी; नाराजी शमेल, मोरेंच्या नेतृत्वात शिवसेना पुन्हा नगराध्यक्षपदी – सचिन कोते यांचा दावा

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sat 15Nov 20.10Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव :उद्धव ठाकरे शिवसेनेकडून महिला जिल्हाप्रमुख व माजी नगरसेविका सपना मोरे यांना मशाल चिन्ह देत अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी शनिवारी दुपारी पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करताच शहरात राजकीय तापमान चढले.

उमेदवारी जाहीर होताच सपना मोरे म्हणाल्या, “आजवरच्या निष्ठेची, कार्याची ही पावती आहे. कोपरगावच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे. नगरपालिकेचा अनुभव असल्याने ही जबाबदारी अधिक परिणामकारकपणे पार पाडता येईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उमेदवारीनंतर पक्षातील नाराजीबाबत विचारले असता त्या म्हणाल्या,“उमेदवारीला अपेक्षा असतातच… काहीजण नाराजही असतील. पण सर्वांना एकत्र आणत आम्ही लढणार. पक्षात फूट नाही—शिवसेना एकसंध आहे,” असा ठाम संदेश त्यांनी दिला.

यावेळी जिल्हाप्रमुख सचिन कोते म्हणाले,
“सर्व नाराजी दूर करून महाविकास आघाडी व मनसे रिपाई मित्रपक्ष म्हणून आम्ही एकत्रितपणे लढत आहोत. कोपरगावात पुन्हा शिवसेनेचा नगराध्यक्ष आणणार याबाबत कोणतीही शंका नाही.”

भरत मोरे यांनीही उत्कट भावना व्यक्त करत म्हटलं,“वीस-पंचवीस वर्षे शिवसेवेत काम करत आलो. पक्षाने टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. सर्वांना सोबत घेऊन शहरासाठी काम करणार.”

पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख सचिन कोते, राहाता तालुकाप्रमुख संजय आप्पा शिंदे, विधानसभा संघटक असलम शेख, युवा सेना अध्यक्ष गगन हाडा उपशहर प्रमुख भूषण पाटणकर यांसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page