“चिन्हच ठरवणार नगराध्यक्ष; उमेदवाराची तीन मते, पक्षाचा जॅकपॉट!!”
The Mayor will decide the symbol; Three votes for the candidate, the party’s jackpot!!”
“चार पक्ष, १२० उमेदवारांना संधी, अपक्ष वेगळे तिकिटांची लगबग, मतदार गोंधळणार नाही… थेट ‘चिन्हावर’ बोट!”
नगरपालिका निवडणूक : चिन्हांचा खेळ, उमेदवारांची धांदल… आणि मतदाराचे मन!
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sun 16Nov 16.10Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव नगरपालिका निवडणूक यंदा थेट जनतेतून नगराध्यक्ष या प्रयोगामुळे तापली आहे. पण खास गोष्ट काय?उमेदवार आता तीन मते मागतोय! एक मत नगराध्यक्षासाठी, दोन मतं नगरसेवकांसाठी यासाठी प्रत्येकाची मागणी जास्त म्हणजे स्वतःबरोबर इतरांसाठी असणार !
पण खरी गम्मत इथेच आहे चिन्हएक मात्र फायदा दुप्पट!
यावेळी यावेळी अपक्ष व्यतिरिक्त भाजपचे कमळ, राष्ट्रवादीचे घड्याळ, ठाकरे गटाची मशाल, आणि शिंदे गटाचा धनुष्यबाण ही चार पक्षांची चिन्हे! पूर्वी पक्षापेक्षा गटागटात छत्री, कपबशी, मोगरी, बल्ब, अशा विचित्र चिन्हांची रेलचेल…त्यामुळे मतदार देखील गडबडून जात असे !
पण आता? मतदाराला त्याचं आवडतं चिन्ह म्हणजे त्याचं मत!
क्रॉस वोटिंग नाही, गोंधळ नाही,ज्याचे चिन्ह मजबूत तो उमेदवार डबल इंजिनप्रमाणे सरळ पुढे! हीच नगराध्यक्षासाठी मोठी फायद्याची लॉटरी आहे.
यावेळी सरळ जनता नगराध्यक्ष ठरवणार पण नगराध्यक्ष उमेदवार शहराच्या प्रत्येक गल्लीत पोहोचेल का? कारण वेळ केवळ साडेचार दिवस प्रचार… त्यात एवढं मोठं शहर? नाही शक्य नाही म्हणूनच…
नगरसेवकच नगराध्यक्षाचा प्रत्यक्ष चेहरा!
ज्या प्रभागात ज्या पक्षाचा नगरसेवक मजबूत,तिथे त्या पक्षाचा नगराध्यक्ष उमेदवार ‘क्लीन स्वीप’! म्हणजे नगराध्यक्षाचे नशिब = नगरसेवकाचे कर्तृत्व + पक्षाच्या चिन्हाची ताकद. असे गणित मांडावे लागेल. आणि परिस्थिती देखील तशीच आहे.
स्थानिक निवडणुकांत प्रतिमा जास्त महत्त्वाची… पण यावेळी समीकरण उलटं!
सामान्यतः नगरपालिका निवडणूक म्हणजे“हा कार्यकर्ता कसा? त्याचं घर कुठे? लोकांशी वागणूक काय?”सगळा तपशील मतदाराला माहित असतो! पण यावेळी मात्र चिन्ह महत्वाचं,चार पक्ष मैदानात, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत नेत्यांची लोकप्रियता विचारात घेतली जाणार आहे. थोडक्यात काय तर उमेदवारापेक्षा ‘ब्रँड’(पक्ष आणि चिन्ह) जास्त चमकतोय! थोडक्यात काय तर नगराध्यक्ष पद तर थेट राज्य-राष्ट्र पातळीवरील वाऱ्याने ठरणार!
उमेदवारांची धावपळ, तिकिटं नाही मिळालं तर पळून दुसऱ्या पक्षात जाण्यास संधी!
आज कोल्हेंचे, काळेंचे पॅनेल असताना डझनभर कार्यकर्ते बाहेरच राहायचे.पण यावेळी? चार पक्ष = १२० उमेदवारीची संधी! एकाने नाकारलं तर दुसरा पक्ष पायघड्या टाकण्यास तयारच काहींची ‘तिकिटासाठी धावपळ’ सुरु, एकाच रात्रीत पक्षप्रवेश शक्य, इथे मात्र वर्षानुवर्ष नेत्यासाठी आणि पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची कुचुंबना आणि हिरमोड होणार आजची वेळ निघून जाईल परंतु त्याचे पडसाद भविष्यात पक्षासाठी घातक व दूरगामी ठरतील यात शंका नाही
म्हणजे उमेदवारीची बाजारपेठच जणू उघडी पडली आहे! मतदाराचे अखेरचे गणित — ‘चिन्ह कुठलं?’ हेच महत्त्वाचं! मतदार आता विचारतो “पक्ष कुठला?” “राज्यात कोण?” “दिल्लीची हवा कोणत्या बाजूला?” आणि त्यानुसार मशाल, कमळ, घड्याळ, धनुष्यबाण अपक्ष याचे मत तयार होणार यापैकी जी छाप मनावर कोरलेली आहे बोटही तिथेच पडणार! कारण यावेळी ? चिन्हांची वादळ, नेत्यांची लोकप्रियता, पक्षाची ताकद, नगरसेवकांची प्रतिष्ठा हे सगळं एकत्र येऊन थेट नगराध्यक्षाचा उमेदवार ठरणार! थोडक्यात काय तर या निवडणुकीत उमेदवार नाही तर चिन्हे भिडणार आहेत. नगरसेवक मेहनत करतील,त्याचा पूर्ण फायदा नगराध्यक्ष उचलतील,आणि मतदार म्हणेल “माझ्या मनातलं चिन्ह ठरलं की बस!”
चिन्हाचे महत्त्व आपण सर्वजण जाणतोच आहोत कारण होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत “पक्षाचं चिन्ह तळागाळात पोहोचलं तर पक्ष जिंकतो…याच नियमाने नगरसेवक मेहनत करतो तर नगराध्यक्ष जिंकतो,आणि मतदार? तो फक्त चिन्ह बघून बटन दाबणार !”
या निवडणुकीचं मोठं गुपित एकच –
ज्या पक्षाचं चिन्ह तळागाळात पोहोचेल, त्याचाच नगराध्यक्ष होणार नगरसेवकांच्या ताकदीवर नगराध्यक्षाचा भविष्य अवलंबून…आणि चिन्हांच्या झगमगाटात उमेदवारांची ‘तीन मतांची’ मागणी ही नवी राजकीय कॉमेडी!“थोडक्यात काय तर यावेळी उमेदवार नव्हे… ‘चिन्ह’ लढतंय, प्रभागात नगरसेवक मेहनत करणार,आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सरळ त्याचा फायदा घेणार!”म्हणूनच आता संपूर्ण भार नगरसेवकांवर ज्या प्रभागात ज्याचा नगरसेवक ताकदवान तिथे नगराध्यक्ष उमेदवाराचा विजय जवळजवळ पक्काच.नगरसेवक आहे तर नगराध्यक्ष आहे. नाही तर उमेदवाराची जागाच रिकामी!
चौकट
कोणी कुणाला अडवायचं नाही,
खाज असेल तर उभं राहूनच जिरवायची!
कट-कात्रीचं राजकारण संपलं म्हणे,
आता फॉर्म घ्या आणि मैदानात उतरा, धाडस असेल तर!
महत्त्वाकांक्षा, राग, सूड,
सगळ्यांचं स्वागतच, बस्स!
आणि मतदारही ठाम,
“तुमची किमत आम्हीच ठरवणार!”
बोलके किती, कामाचे किती,
याचा निकाल बॅलेटच देणार!
Post Views:
41