मध्यरात्री झावरेंची शिंदे दरबारात हजैरी, निवडणूकीत वेगळी रंगत येणार

मध्यरात्री झावरेंची शिंदे दरबारात हजैरी, निवडणूकीत वेगळी रंगत येणार

Zaveri’s appearance at Shinde’s court at midnight will have a different impact on the elections

यशोधन निवासस्थानी राजेंद्र झावरे यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी भेट; औताडे, नरोडे, जाधवही उपस्थित

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Wed 19Nov 22.250Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव – नगराध्यक्षपदाची निवडणूक तापत असतानाच मंगळवारी मध्यरात्री ठाण्यातील “यशोधन’ या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या गुप्त भेटीने कोपरगावच्या राजकारणात जोरदार खळबळ उडाली आहे. धनुष्यबाण चिन्हावर उमेदवारी दाखल केलेले राजेंद्र झावरे यांनी या मध्यरात्रीच्या भेटीत शिंदे यांच्यासमोर हजेरी लावताच शहरातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळू लागली आहे.

या भेटीला जिल्हाप्रमुख नितीन औताडे, उपजिल्हाप्रमुख मनिल नरोडे आणि शहर प्रमुख अक्षय जाधव हेही सोबत होते. झावरेंची शिंदे भेट ही साधी शिष्टाचार भेट नसून कोपरगावातील निवडणूक रणधुमाळीला ‘वरिष्ठ पातळीवरील पाठबळ’ मिळाल्याचे स्पष्ट संकेत असल्याचा सूर स्थानिक राजकारणात उमटू लागला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत चर्चा झाल्याने धनुष्यबाण गट कोपरगावात अधिक आक्रमक होणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. विरोधकांनी या हालचालीकडे ‘मध्यरात्रीचा राजकीय प्लॅन’ म्हणून पाहत टोमणे झाडले आहेत, तर समर्थकांमध्ये मात्र या भेटीनंतर मोठी उत्सुकता आणि आत्मविश्वास वाढलेला दिसत आहे.

झावरे–शिंदे यांच्या या भेटीमुळे कोपरगावातील निवडणूक वातावरण आणखी तापले असून पुढील काही दिवसांत नवीन राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page