कोपरगाव नगरपालिका : माघारीचा महासंग्राम आज चरमबिंदूवर!

कोपरगाव नगरपालिका : माघारीचा महासंग्राम आज चरमबिंदूवर!

Kopargaon Municipality: The great struggle for return is at its peak today!

नगराध्यक्ष ८ – नगरसेवक १२७ कायम रिंगणात • मातब्बरांची धावपळ • दबाव–समजोत्यांची अखेरची जुगलबंदी

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Fir 21Nov 21.00Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत आजचा (२१ नोव्हेंबर) माघारीचा अंतिम दिवस पूर्ण तालुक्याचे राजकीय तापमान डोक्यावर घेऊन आला आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यानची माघारी प्रक्रिया सुरू होताच राजकीय गल्लीपासून मोठ्या नेत्यांच्या ड्रॉईंगरूमपर्यंत वातावरण तापले. प्रतिस्पर्ध्याला रिंगणातून बाहेर ढकलण्यासाठी फोन कॉल्स, गाठीभेटी, दबाव, समजुती आणि ‘डील’ यांचा धडाका कायम राहिला.

अखेरीस नगराध्यक्षपदासाठी तब्बल ९ जणांचे १५ अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर ८ उमेदवारच शाबूत राहिले. नगरसेवक पदासाठी २०१ उमेदवारांनी २३७ अर्ज दाखल केले होते; त्यापैकी ५६ अर्ज बाद झाल्याने १६१ उमेदवार रिंगणात उरले.

पहिल्या दोन दिवसांत नगराध्यक्षपदासाठी सुहासिनी कोयटे यांच्यासह चार नगरसेवक उमेदवारांनी माघार घेतली. मात्र शुक्रवारी अंतिम दिवशी एका नगराध्यक्ष उमेदवारानेही माघार घेतली नाही, आणि त्यामुळे नगराध्यक्षपदासाठीची आठ जणांची थेट तगडी लढत अधिक तीव्र झाली.

नगरसेवकपदासाठी माघारीनंतर १२७ उमेदवारांची अंतिम नावे रिंगणात ठरली असून प्रत्येक प्रभागात प्रचंड चुरस निर्माण झाली आहे.

आज कोणाचा ‘गेम प्लॅन’ फसला? कोणाला दाबून माघारी घ्यायला लावले? कोण कुणाला शेवटच्या क्षणी टांगणीला लावून गेला? यावर दिवसभर चर्चा रंगत राहिली.

कोपरगावच्या राजकारणासाठी आजचा दिवस अग्निपरीक्षा ठरला असून, संध्याकाळी अखेर निवडणूक रिंगणातील खात्रीची आकडेवारी समोर आली — नगराध्यक्ष ८ आणि नगरसेवक १२७ यांनीच लढाईत टिकून राहिल्याची अधिकृत नोंद झाली.

राजकीय हिशेब, जाताजाता होणाऱ्या गाठीभेटी आणि शेवटच्या मिनिटातील ‘थ्रिलर’ने कोपरगावातील निवडणूक रंगत आणखी चढली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page