काळाची पावले ओळखणारा नेता तुमच्याकडेच! – सुनील तटकरे
You are the leader who understands the steps of time! – Sunil Tatkare
“घड्याळ जिंकलं तर विकास जिंकेल—काका कोयटे यांना विजयश्री द्या!”
“If the clock wins, development will win—give victory to Uncle Koyte!”
“आशुतोष काळे काम न संपणारा नेता; कोपरगावच्या विकासाला आता पूर्ण वेग!”
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Fir 21Nov 21.30Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :“आशुतोष काळे यांच्या रूपाने कोपरगावला काळाची पावले ओळखणारे, निर्णयक्षम, लोकनाडी वाचणारे नेतृत्व लाभले आहे. सव्वा लाख मताधिक्याची किमया हा योगायोग नसून विकासाचा प्रचंड वेग आहे. नगरपालिकेतून येणारा प्रत्येक प्रस्ताव १०० टक्के मंजूर करणार—ही माझी ठाम हमी आहे,” असा थेट, कडक आणि विकासलक्षी संदेश राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी दिला.
शुक्रवार, दि.२१ नोव्हेंबर रोजी विघ्नेश्वर मंदिरातील नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर, दुपारी चार वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर झालेल्या प्रचंड सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोक काळे होते.
व्यासपीठावर राष्ट्रवादीचे वजनदार नेतृत्व महिला राज्याध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार आशुतोष काळे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे, सौ. सुहासिनी कोयटे, माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, कारभारी पाटील आगवन यासह १५ प्रभागांतील सर्व उमेदवार उपस्थित होते.
तटकरे म्हणाले, “घड्याळाला सत्ता दिली, तर शहरातील प्रत्येक प्रलंबित प्रश्न मार्गी लागेल. २३ दिवसांचे पाणी चार दिवसांवर आणणारा पाणीदार नेता आशुतोष काळे हा कोपरगावचा सर्वात मोठा आधार आहे. गेली चार वर्षे नगरसेवक नसतानाही कामांची उणीव भासू दिली नाही. रस्ते–पाणी–दिवे–समाजमंदिर अशा प्रत्येक ठिकाणी त्यांनी विकासाचे ठसे उमटवले.”
“कोयटे–कुदळे यांना एकत्र आणणे म्हणजे ४० वर्षात कुणालाच न जमलेला पराक्रम; तो आशुतोष काळे यांनी केला. कार्यालयीन इमारती, भुयारी गटार, जलपुरवठा–या कामांवर पुस्तिका काढली तर किमान वीस पुस्तकं लागतील,” तटकऱ्यांचा टोला अचूक बसला.
आमदार आशुतोष काळे म्हणाले, “२३ दिवसांचे पाणी ४ दिवसावर आणले; आता भविष्यात मला रोज पाणी द्यायचे आहे असा संकल्प मी केला आहे.शब्द दिलाय आणि मी शब्द पाळतो. ही निवडणूक कोपरगावच्या उज्वल भविष्यासाठी निर्णायक आहे.”
विरोधकांना नाव न घेता त्यांनी हल्ला चढवला,“विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आता द्राक्ष आंबट नाही, ‘काका आंबट’ लागू लागले म्हणून अपप्रचार सुरु आहे. ४०–५० वर्षे सोबत असताना कौतुक; दूर गेल्यावर बदनामी. आता अस्तित्वाची लढाई झाल्याने न्यायालयात पळ काढत आहेत.”
काका कोयटे मंचावर ठामपणे म्हणाले,
“मी आता पूर्ण वेळ कोपरगावला. “एकच ध्यास कोपरगावचा २४ तास विकास”! ३००० कोटींची कामे कोण अडवू शकत नाही.”विकास कामाच्या पाढा मी वाचणारच आहे वेळ कमी आहे आणि विरोधकांनी केलेल्या कृत्याचा समाचार मी कॉर्नर सभेत घेणार आहे अशी दमदार घोषणा करून त्यांनी आपली भूमिका जाहीर करून विरोधकांना चोख उत्तर दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पद्माकांत कुदळे यांनी केले;आभार कृष्णा आढाव यांनी मानले.
यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.
Post Views:
29






