कोपरगाव महामार्गावर बिबट्याची दिमाखदार हजेरी!
A leopard makes a striking appearance on the Kopargaon highway!
पाम पॅराडाईजजवळ ‘रोड शो’; वनविभाग झोपेत? नागरिक संतप्त!
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sun 23Nov 18.30Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :कोपरगाव–येवला रोडवर पाम पॅराडाईज हॉटेलसमोर दिवसा ढवळ्या बिबट्याची थाटात एन्ट्री! सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नरोडे वस्तीच्या दिशेने महामार्ग ऐटीत ओलांडणारा हा बिबट्या थेट डॉ. राजेंद्र श्रीमाळी यांच्या नजरेसमोरूनच चालत गेला. क्षणभरासाठी वाहतूक थबकली, तर डोळे विस्फारून हा ‘महामार्ग सम्राट’ लोकांच्या नजरा खिळवून गेला.
श्रीमाळी यांनी तात्काळ नागरिकांना इशारा देत सतर्कतेचे आवाहन केले.दरम्यान, या भागातील बिबट्याचा दहशतवाद काही महिन्यांपासून सुरु असून दोन बळी गेल्यावर एक बिबट्या पकडण्यात आला होता. पण पुन्हा महामार्गावरच बिबट्याचा दिमाखदार फेरफटका, यामुळे परिसरात भीतीचे सावट गडद झालं आहे.
संध्याकाळी अंधार पडल्यावर संपूर्ण भागात सन्नाटा पसरतो; महिला, शेतकरी तर घराबाहेर पाय टाकायलाही घाबरत आहेत.
यावर नागरिकांचा संताप उफाळला,
“वनविभाग झोपेत आहे का? अजून किती बळी गेले तर हालचाल करणार?” असा टोकाचा सवाल उभा राहिला आहे.
परिसरात तातडीने पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
महामार्गावरच बिबट्याची उघड दादागिरी—थेट वनविभागालाच आव्हान!
Post Views:
110