कोपरगावमध्ये ‘याचिका’चे राजकारण फसलं! कोयटे–काळे यांचा विरोधकांवर जोरदार प्रहार
‘Petition’ politics fails in Kopargaon! Koyte-Kale’s sharp attack on the opposition
“पराभव दिसला की न्यायालयात धाव… विरोधकांची जुनी सवय!” – काका कोयटे
“ही याचिका नाही, राजकीय आत्महत्या!” – ॲड. विद्यासागर शिंदे
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Tue 25Nov 15.00Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: कोपरगाव नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तापलेल्या वातावरणात दोन दिवसांच्या सुनावणीनंतर न्यायालयाचा निकाल लागला आणि त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवार काका कोयटे यांनी मंगळवारी (२५) रोजी सकाळी पत्रकार परिषदेत विरोधकांना झणक्यात उत्तर दिले.
“खोटं बोल, पण रेटून बोल’… हीच विरोधकांची इसापनीती” कोयटे यांचा निशाणा
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच काका कोयटेांनी घणाघाती आरोप करत वातावरण तापवले.ते म्हणाले,“पराभव समोर दिसू लागला की न्यायालयाच्या दाराआडून रडायची सवय विरोधकांची जुनीच! तथ्य नसलेली, फालतू, दिशाभूल करणारी याचिका दाखल करून त्यांनी समोरच्यांचे अर्ज उडणार’ सांगून बिनविरोध होण्याचे स्वप्न दाखवत स्वतःच्या उमेदवारांनाच फसवलं. ‘
कोयटे पुढे म्हणाले,“न्यायालयाने सत्याचा विजय केला. आम्ही जल्लोष करत नाही, कारण काहीच दम नव्हता त्या दाव्यात. हे सरळसरळ पराभव टाळण्यासाठी केलेलं षडयंत्र!”
कोयटे हल्ला चढवतांना म्हणाले की,“मी पन्नास वर्षे राजकारण केले. जनता मला ओळखते. पण जनता समोरच्या उमेदवारालाच ओळखून आहे. एक गल्ली, एक माणूस सांगू शकत असतील तर सांगावं!”
ते पुढे म्हणाले की,“अजित पवारांनी दिलेल्या निधीमुळे शहरात कामांची रेलचेल आहे. मी प्रत्येक प्रभागात फिरलो… कामांचे धक्के बसतात! काळेंचे काम लोक पाहतायत आणि निर्णयही तेच देतील.”
ॲड. विद्यासागर शिंदे : “ही याचिका नव्हे, विरोधकांची सरळ राजकीय आत्महत्या”
कायदेशीर बाबी सांगताना ॲड.. शिंदे म्हणाले,“शपथपत्रातील उणिवांच्या नावाखाली याचिका दाखल केली. पण त्यात मजकूर नव्हता, तथ्य नव्हतं आणि कायदेशीर आधार तर नव्हताच हे पूर्ण राजकीय स्टंट होते. ‘खोटं बोल, पण रेटून बोल’ हाच विरोधकांचा मंत्र!”
त्यांनी आणखी धारदार आरोप करताना ते पुढे म्हणाले “निकालाने स्पष्ट झालं, लोकशाहीत निकाल जनता देते, न्यायालय नाही. छाननीच्या वेळी विरोधकांनी हरकत घेतली नाही, आणि नंतर रडगाणं सुरू केलं. हेतू वाईट… म्हणूनच शेवटही वाईट असा शेलका टोला त्यांनी लगावला.
व्यापाऱ्यांना धमकी? दोन जणांचा बीपी वाढला? कोयटे यांचा गंभीर आरोप
कोयटे म्हणाले,“काल मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी व्यापाऱ्यांमध्ये विरोधकांनी दहशत निर्माण केली. दोन व्यापाऱ्यांना बीपी वाढून दवाखान्यात जावं लागलं! हा प्रकार निंदनीय.”
तसेच कोयटे यांनी थेट प्रश्न केला,“माझ्यावर ‘धोका दिला’ म्हणतात. पण मी कधी त्यांच्या पक्षात होतोच कुठे? उलट कोल्हे कुटुंबीयांनी मला किती वेळा धोका दिला त्याची गणतीच नाही!” असा संतप्त सवाल देखील त्यांनी केला.
आमदार आशुतोष काळे : “विरोधकांना जनतेचा कौल माहीत आहे… म्हणूनच न्यायालयात पळाले!”
आमदार काळे यांनी टोकदार भाषेत प्रत्युत्तर दिले,“उमेदवारी अर्ज वैध ठरल्यानंतर न्यायालयात जाण्याचा अधिकारच नव्हता. पण पराभव दिसला की काहीतरी उलटंपालटं करायचं… ही त्यांची परंपरा!”
ते पुढे म्हणाले,“अजित पवारांची सभा होणार आहे. त्यातून कोपरगावला मोठा निधी मिळणार. जनता आमच्या कामावर खूश आहे.३ तारखेला गुलाल आमचाच उडणार… हा विश्वास आहे!”
पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा आढाव शहराध्यक्ष सुनील गंगुले, वीरेंद्र बोरावके आदि सह राष्ट्रवादीचे पदाधिकारी हजर होते
Post Views:
37





