वाजे बंधूंचा जोरदार पाठिंबा’; अतुलशेठांचा ‘त्याग,भाजपसाठी विजयी धक्का
Strong support from Vaje brothers; Atulsheth’s ‘renunciation, a victorious blow for BJP’
नगराध्यक्ष रणधुमाळीत पराग संधानांना दुप्पट ताकद, गटांतर्गत मतभेद शून्यावर!
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Tue 25Nov 17.30Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपला आज अक्षरशः मोठी ऊर्जा देणारा दिवस ठरला. दीर्घकाळ इच्छुक असलेले दीपक वाजे यांनी आणि त्यांच्यामागील शेकडो युवकांनी अधिकृतपणे भाजप उमेदवार पराग संधान यांना पाठिंबा देऊन त्यांच्या खांद्याला खांदा लावण्याची घोषणा केली. त्यावर ‘बोनस’ म्हणून प्रभाग क्र. ४ चे दिग्गज अतुलशेठ काले यांनी स्वतःची उमेदवारी मागे घेऊन युवा आकाश वाजेंना जागा देत केलेला त्याग भाजपमध्ये प्रचंड उत्साह भडकवणारा विजय धक्का ठरला.
भाजप संपर्क कार्यालयातील पत्रकार परिषदेत युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक वाजेंनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “सन२०१०-११ साली अतिक्रमणात विस्थापित झालेल्या ६७० कुटुंबांचे पुनर्वसन हे माझे उद्दिष्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः हे प्रकरण मार्गी लावण्याची घोषणा केल्यानंतर स्वतंत्र लढाईची गरजच उरली नाही.”या एकाच वाक्याने वाजे समर्थकांचा ओढा थेट पराग संधानांकडे वळताना दिसला.
दरम्यान, अतुलशेठ काले यांनी ‘मनाचा मोठेपणा’ दाखवत नगरसेवकपदाची उमेदवारी सोडली आणि नगराध्यक्षासह सर्व ३१ भाजप उमेदवारांसाठी प्रचाराचा धुरा वाहणार असल्याची घोषणा केली. शहरातील व्यापारी वर्ग, समाजघटक आणि हजारो कार्यकर्त्यांशी असलेला काले यांचा सखोल संपर्क पाहता, हा निर्णय भाजपसाठी गेम चेंजर ठरणार, अशी पक्षांतर्गत ठाम भावना आहे.”काले कुटुंबाची “पक्षाचा विजय म्हणजे शहराचा विजय” ही भूमिका कार्यकर्त्यांना चांगलीच भावली.
पराग संधान म्हणाले, “वाजे बंधू स्वगृही आले हा पक्षाचा मोठा विजय. त्यांच्या न्याय्य मागण्यांवर मुख्यमंत्री स्तरावर दिलासा मिळाल्याने कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुपटीने वाढला. तसेच अतुलशेठांनी केलेला त्याग हा माझ्यासाठी खरेच बळदायक ठरला असून विजय निश्चित आहे.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार स्नेहलता कोल्हे, बिपिन कोल्हे विवेक कोल्हे यांच्यासह भाजप नेतृत्वाने या सर्व निर्णयांचे स्वागत करत रणधुमाळीत नवी गती दिली.
चौकट
नगरपालिका रणधुमाळीत भाजपचा ‘ताकद त्रिकोण;!वाजे बंधूंचा पाठिंबा,अतुलशेठांचा त्याग व मुख्यमंत्रीस्तरावरील दिलासा या त्रिगुणी ‘टॉनिक’मुळे कोल्हे गटांतर्गत मत विभाजनाचा मोठा धोका टाळला असून भाजपची ताकद तिपटीने वाढली असून गटांतील फुटीला ‘ब्रेक’ लागला. त्यामुळे नगराध्यक्षाच्या लढाईत भाजप आता अधिक टोकदार, अधिक धारदार थेट विजयाच्या उंबरठ्यावर!
Post Views:
36






