कोपरगाव चा जन ठराव फडणवीसांच्या सभेत मंजूर
Kopargaon’s public resolution approved in Fadnavis’ meeting
विवेक कोल्हे यांचा विकास ब्ल्यू प्रिंट जनतेची हात वर करून मोहर
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Tue 25Nov 18.30Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :रविवारी शहराच्या राजकारणात असा स्फोट झाला की विरोधकांच्या तंबूत दिवे मंद. मुख्यमंत्री फडणवीसांच्या मेगा सभेत विवेक कोल्हे यांनी मांडलेला “जनठराव” वाचून संपायच्या आतच जनतेनं हात वर करून ठोकून दिली मंजुरी. कागदावरील घोषणा नव्हे… थेट जनतेच्या आवाजाची सार्वजनिक स्वाक्षरी!
ठरावातील ‘धडधडीत’ मुद्दे
गोदावरी घाट सुशोभीकरण : पर्यटन वाढवा, बाजाराला चालना द्या, कोपरगावचा चेहरा बदला, धुळमुक्त कोपरगाव : सिमेंट रस्ते , बंदिस्त गटारी… शहराला धूळ-चिखलाचा कंटाळा झाला.नियमबद्ध घर-जागा: वसाहतींचं वर्षानुवर्षांचं डोकेदुखी संपवण्याचा कोल्हेंचा थेट ‘हातोडा’.प्रत्येक वसाहतीसाठी ठोस प्रकल्प : लक्ष्मी नगर ते साईनगर सगळ्यांचा विकास, कुणी हुकला नाही! स्वच्छ पाणीपुरवठा : नळातून येणाऱ्या राजकारणाला पूर्णविराम—नियमित, स्वच्छ पाणीची हमी.उन्नत आरोग्य सेवा : नागरी आरोग्य व्यवस्थेत मोठी उडी; रुग्णांचे चकरा संपणार.हद्दवाढ भागासाठी विशेष निधी : विकासाच्या बाहेर टाकलेल्यांना ‘मुख्य प्रवाहात’ आणण्याचा प्लॅन.विस्थापितांचे प्रश्न : दिरंगाई संपवण्याचा शब्द… कोल्हेंची थेट बांधिलकी फडणवीसांची ‘मंजूरी’
सभेत मुख्यमंत्री फडणवीस मंचावरूनच जाहीर विधान करतात“कोल्हे यांनी मांडलेला विकास विश्वासनामा पूर्ण करणे माझी जबाबदारी… कोपरगावचा विश्वास मी फेडणारच!”
जनतेसमोर ठराव मंजूर करणारा हा प्रयोग विरोधकांना धक्का.नगरपरिषद निवडणुकीत विकासराजकारणाचा सूर बदलण्याची शक्यता.कोपरगावमध्ये पुढील काही दिवसांत नव्या गठजोडींची हालचाल गरम.“जनठराव” झाल्याने कोल्हेंची प्रतिमा थेट जनतेच्या कोर्टात प्रभाव पाडणारी ठरली असल्याचे राजकीय मत व्यक्त होत आहे .
चौकट
कोपरगावमध्ये रविवारी फक्त सभा झाली नाही शहराच्या विकासावर जनतेने हात वर करून ठरावाला संमती देऊन मोहर उमटवली.
Post Views:
26