हद्दवाढीसाठी आम्ही झगडलो, आता तुमची पाळी : मतदानातून आशीर्वाद द्या! स्नेहलता कोल्हे
We fought for boundary extension, now it’s your turn: Bless us by voting! Snehlata Kolhe
“इथे काम बोलते, तिकडे विरोधक खोटं बोलतात!”
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Thu 27Nov 18.00Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव:“कोपरगाव शहरातील हद्दवाढ हा खेळ नव्हता. फायली, शासनदरबार, मंत्रालयात शेकडो फेरफटका मारून हा प्रश्न आम्ही मिटवला! त्याची किंमत आम्ही दिली, विरोधकांनी फक्त बदनामी केली!” हद्दवाढीसाठी आम्ही झगडलो, आता तुमची पाळी, आता मतदानातून आशीर्वाद द्या असे आवाहन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी प्रभाग क्रमांक एक मधील कॉर्नर सभेत केले
कोल्हे म्हणाल्या,“त्रिशंकू भागाची अडकलेली प्रकरणे आम्हीच सोडवली. दहा कोटी निधी काढून हद्दवाढ मंजूर करवणं ही आमचीच मेहनत!”आणि लगेच विरोधकांना चोख उत्तर,“काम आमचं, श्रेय त्यांचं? बोला ना! विरोधकांचा दावा म्हणजे फक्त राजकीय फुगा!”
“नगराध्यक्ष तुम्ही दिला नाही… म्हणून कामे अडकली!”
मागच्या निवडणुकीत नागरिकांना टोमणाच “नगरसेवक सारे निवडून दिलात पण नगराध्यक्ष पदावर विश्वास कमी दाखवला. त्यामुळे नगरपालिकेच्या अनेक योजना अडल्या!”यावेळी मात्र कोल्हेंचं थेट आवाहन केलं “एकही उमेदवार पराभूत नको. सर्व जागा भाजप-मित्रपक्ष आघाडीकडेच द्या!”
“नगरभवनापासून फायर स्टेशनपर्यंत… विकास आमचा, नाव कोणाचं?”
२०–२५ ठोस कामांची थेट यादी सभेत —
नगरभवन, एसटी स्टँड, पोलीस स्टेशन, वाचनालय, पंचायत समिती, फायर स्टेशन, गोकुळनगरी पूल, बाजार ओटे,“ही कामे स्लाइडशो नाहीत, संघर्षाचे फोटो आहेत!”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कोपरगावच्या सभेत शहराचा विकास झपाट्याने करायचा असेल तर सर्व पॅनेल विजयी करा!” असा थेट आव्हान केले आहे याची आठवण दिली
याच सभेत कोल्हेंनी प्रभाग क्रमांक एकमधील उमेदवारांची ओळखही दमदार शब्दांत वैभव आढाव आणि दीपा गिरमे म्हणजे प्रामाणिक नेतृत्वाची ओळख!
कोरोना काळात कोविड सेंटर उभं करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते याची युवा नेते विवेक कोल्हे यांनी यावेळी त्यांनी आठवण करून दिली
चौकट
“हद्दवाढीसाठी आमचं झगडणं तुम्ही पाहिलं आहे. आता तुमची वेळ आली आहे. मतदानातून आमचे सर्व उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर पाठवा!” स्नेहलता कोल्हे
Post Views:
23





