कोपरगावच्या विकासासाठी पुन्हा राजकारणात; काका कोयटे यांची भूमिका

कोपरगावच्या विकासासाठी पुन्हा राजकारणात; काका कोयटे यांची भूमिका

Back in politics for the development of Kopargaon; Kaka Koyte’s role

राजकीय प्रवासात संघर्ष, गद्दारी अनुभवली ; ‘समाजकार्य कधी थांबवले नाही’ असा दावा

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sat 2‌9Nov 20.25Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव :“गेल्या काही वर्षांत राजकारणापासून दूर राहिलो, परंतु समाजकारण थांबवले नाही. कोपरगावच्या विकासासाठी पुन्हा प्रभावीपणे कार्य करणार,” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी सभेत मतदारांशी संवाद साधला.

भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित प्रचार सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोयटे बोलत होते. सभेचे अध्यक्षस्थान आमदार अशोकराव काळे यांनी भूषविले.

कोयटे म्हणाले, आ.आशुतोष काळेंच्या नेतृत्वाने मला दिशा आणि आधार दिला. काळे कुटुंब म्हणजे नावाप्रमाणेच  प्रामाणिक राजकारणाचं घराणं,  कार्यकर्त्याला कुटुंबासारखं सांभाळणारी माणसं.” या विश्वासू नेतृत्वाच्या शब्दाखातर मी राजकारणात आलो. “राजकारणात गद्दारी व विश्वासघात अनुभवला. मतमोजणीच्या प्रक्रियेतील घटना कोपरगावकरांना माहीत आहेत. त्यामुळे मी राजकारणापासून दूर राहिलो. मात्र समाजकारण थांबवले नाही.” कोरोना काळात सामाजिक उपक्रमांद्वारे सेवा दिल्याचा त्यांनी उल्लेख केला.

शहरातील व्यापार्‍यांच्या पुनर्वसनापासून ते मंदिर उभारणी, बसस्थानकावरील सामाजिक प्रकल्पांपर्यंत अनेक उपक्रम राबवल्याचे त्यांनी सांगितले. कोपरगावच्या भविष्यातील विकासाबाबत आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प राबवण्याचेही ते म्हणाले.सभेस मोठी उपस्थिती दिसून आली.

Leave a Reply

You cannot copy content of this page