रेणुका कोल्हेंचा प्रभाग तीन मध्ये प्रचारफेरींचा हल्ला;
Renuka Kolhe’s campaigning attack in Ward Three;
कोयटेंचा किल्ला निवाऱ्यातच गडगडणार
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sat 29Nov 20.30Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : प्रभाग क्रमांक ३ मध्ये आज रेणुका कोल्हे यांच्या प्रचारफेरीने अक्षरशः धडाका उडवला. स्वतःचा बालेकिल्ला समजत बसलेल्या काका कोयटे यांची स्थिती बिकट असल्याचं चित्र नागरिकांनी उघड उघड व्यक्त केलं आहे. “सुविधा अपुऱ्या, पायाभूत विकास शून्य आणि पाच वर्षे फक्त आश्वासनांचा खेळ!” अशी जनतेची तिखट प्रतिक्रिया.
निवारा भागातील नागरिकांच्या घरांची दुरवस्था, लेआउट-उतारे नसल्याने बँकांच्या कर्जासाठी दारोदार फिरण्याची वेळ हा प्रश्न वर्षानुवर्षे मुद्दाम रखडवून राजकीय पिळवणूक करणाऱ्यांना यंदा घरचा आहेर देऊ” असा संताप नागरिकांनी व्यक्त केल्याचे रेणुकाताई म्हणाल्या.
प्रचारफेरीदरम्यान पराग संधानांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.
“विकासाचा मुद्दा असेल तर मुख्य बाजारपेठेत चर्चा करा. आम्ही तयार! २५ वर्षांनी आजच विकासाचा प्रश्न आठवतो कसा? सत्ता सोळा वर्षे ज्यांच्याकडे होती त्यांच्याकडे दृष्टी कुठे होती?” असा सवाल त्यांनी केला.
रेणुकाताईंच्या शैलीत थेट उत्तर “मी २४ तास, १२ महिने, १० वर्षे रस्त्यावर आहे. सामाजिक काम आमचं जनतेसमोर स्पष्ट. तुमची कामगिरी फक्त निवडणूक-जोगवा!”
रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, महिलांसाठी शौचालये, स्वच्छ कारभार व नाविन्यपूर्ण योजना,हा आमचा विश्वास-नामा आणि जनतेनेही त्याला शिक्कामोर्तब केलंय. असंही त्या म्हणाल्या,
पराग संधानांचा दावा ठाम:“निवाऱ्यातून विक्रमी मताधिक्याचा विस्फोट! भारतीय जनता पक्ष विजयीच.”
चौकट
रेणुकाताईंच्या प्रचारफेरीने वातावरण तापलंय… विरोधकांची पकड सैल… आणि प्रभाग ३ मध्ये निवडणुकीचा सूर स्पष्ट“विकास विरुद्ध भुलथाप”
Post Views:
30





