तुमचे कारनामे आम्ही उघडायला लागलो तर दिवस कमी पडतील” — विवेक कोल्हे

तुमचे कारनामे आम्ही उघडायला लागलो तर दिवस कमी पडतील” — विवेक कोल्हे

“If we start revealing your exploits, the days will be shorter” — Vivek Kolhe

कोयटे ‘मर्यादा’ विसरल्यावर विवेक कोल्हे यांचा सडेतोड प्रहार!

कोपरगाव: कोपरगावातील राजकीय वातावरणात ठिणगी पेटवणारा आणखी एक धगधगता हल्ला,कोयटे यांनी आरोपांची पातळी खालावल्याने विवेक कोल्हे यांनी टिळकनगरच्या प्रभाग ७ मधील कॉर्नर सभेत गोळीबाराच्या झडपा उघडल्या.

“कोपरगावच्या विकासासाठी आजपर्यंत काहीही न करणाऱ्या लोकांना कोल्हे कुटुंबावर बोट दाखवण्याचा अधिकार नाही,” असा घणाघात कोल्हे यांनी केला. कोयटे कुटुंबावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी कोल्हे साहेबांनीच अनेकांना पुढे आणले, त्यात कोयटे देखील होते, हे ते सोयीस्कर विसरतात,” असा पलटवार केला.

कोल्हे यांनी पुढे म्हटलं,आमच्यावर टीका करण्यापूर्वी त्यांच्या सुपुत्रांनी स्वतःचा इतिहास तपासावा. वर्षानुवर्ष दिसतही नाहीत आणि वर बोलायला मात्र सुरुवात करतात!”

कोल्हे यांनी सभा मंचावरून कोयटे यांच्यावर विविध आर्थिक व कायदेशीर तक्रारींबाबत प्रश्न उपस्थित करत “राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर परत मैदानात का?” असा थेट सवाल फेकला.

तथापि त्यांनी स्पष्ट केलं,व्यक्तिगत चिखलफेक आमची शैली नाही. पण कुणी अंगावर येतो तर आम्हीही शिंगावर घेण्यास तयार आहोत!”

स्वतःच्या राजकीय ओळखीचा उल्लेख करत त्यांनी जाहीर केलं,मी कोल्हे साहेबांचा नातू आहे. विकास ही आमची परंपरा आहे आणि त्या व्हिजनसाठी मी थेट मैदानात उतरलो आहे.”

प्रभागातील दोन्ही उमेदवारांना मोठी लीड देण्याचे आवाहन करत कोल्हे म्हणाले,
या प्रभागाचे विकासाचे पालकत्व मी स्वीकारतो!”सभा संपली, पण कोपरगावचा राजकीय थर्मामीटर आणखी चढला हे नक्की!

Leave a Reply

You cannot copy content of this page