कोपरगाव नगरपालिकेत अदालतीनं मार्ग मोकळा केला, निवडणूक आयोगाचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत अपेक्षित
The court has cleared the way for Kopargaon Municipality, the Election Commission’s decision is expected by this evening.
कोपरगावमधील अपील यशस्वीरित्या निकाली काढल्यानंतर निवडणुका वेळेत होणार की लांबतील, यासाठी सर्वांचे लक्ष निर्वाचन आयोगाकडे
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sun 30Nov 13.00Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : कोपरगाव नगरपालिका निवडणुकीमध्ये, काही उमेदवारांविरुद्ध स्वाक्षरी, शपथपत्र आदी बाबतीत न्यायालयात याचिका दाखल झाली होती.मात्र जिल्हा व सत्र न्यायालयाने त्या याचिका फेटाळल्या असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या अर्ज स्विकृतीचा निर्णय वैध असल्याचे ठरविले आहे. म्हणजेच अपीलकरीता न्यायालयीन प्रक्रिया वेळेवर आणि निष्पक्ष पद्धतीने पूर्ण झाली आहे.
याबाबत संपर्क साधला असता न्यायालयीन अडचणी दूर झाल्या असून, त्याबाबतची माहिती निवडणूक आयोगाला पाठवली आहे. निवडणूक आयोग Maharashtra State Election Commission आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट निर्णय देईल अशी अपेक्षा आहे. असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेश सावंत यांनी व्यक्त केली.
आयोगाने सकारात्मक निर्णय दिल्यास, कोपरगावमध्ये निवडणुका पूर्वी नियोजित वेळापत्रकानुसार सुरु होऊ शकतात.
मतदार, उमेदवार व स्थानिक नागरिकांसाठी काय महत्त्वाचे?उमेदवारांसाठी अर्ज वैध ठरल्याने त्यांचा प्रचार, उमेदवारी यांची अखेरची तयारी पुन्हा सुरु होईल.मतदारांमध्ये उद्भवलेल्या अनिश्चिततेमुळे असलेल्या गोंधळावर आता स्पष्टता येण्याची शक्यता आहे.स्थानिक प्रशासनासाठी — वेळापत्रकात बदल झाला नाही तर मतमोजणीसह निवडणूक पूर्ण होईल.
हे सर्व हे सर्व जरी खरे असले तर अंतिम निर्णय हा महाराष्ट्र निवडणूक निर्णय आयोग घेणार असल्याने याबाबत बोलणे उचित ठरणार नाही निवडणूक प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात आले असताना अचानक झालेल्या भूकंपाने उमेदवार नेते कार्यकर्ते सर्वांचाच जीव टांगणीला लागला असून चर्चेला उधाण आले आहे यामुळे संध्याकाळी निवडणूक आयोग काय निर्णय देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चौकट
अहिल्यानगरमधील १२ पैकी कोपरगावसह ४ नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलण्याची बातमी समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली. मात्र कोपरगावची वस्तुस्थिती वेगळी आहे. कोपरगावमधील २९ उमेदवारांवर दाखल झालेल्या अपीलाचा निकाल अपील कालावधी संपण्याआधीच न्यायालयाने दिला असून हा निर्णय निवडणूक आयोगाला कळविण्यात आला आहे.
कोट
ज्या ठिकाणची न्यायप्रविष्ठ प्रकरणे ही 23 तारखेपर्यंत निकाली निघाली त्याच नगरपालिकेची निवडणूक ठरलेल्या वेळेत होणार आहे. कारण कायदे तज्ञांच्या मते अपील निकालाचा कालावधी कमीत कमी तीन दिवसाचा असावा लागतो . अपिलाची मुदत 25 तारीख असलेले कोपरगाव चा निकाल हा 24 तारखेला लागल्याने कोपरगावच्या नगरपालिका निवडणुकीवर टांगती तलवार कायम असल्याचे कायदे तज्ञांचे म्हणणे आहे
म्हणूनच आता निवडणुका वेळेत होणार की वाढणार, याचा अंतिम निर्णय निवडणूक आयोग आज संध्याकाळपर्यंत देण्याची शक्यता आहे.म्हणूनच— गोंधळ करू नका, निर्णयाची वाट पहा! आणि आपला प्रचार सुरूच ठेवा.चर्चा, उत्सुकता आणि तणाव शिगेला पोहोचले असले तरी अंतिम शब्द निवडणूक आयोगाचा! तुर्तास इथेच थांबू बाकी पुढे
Post Views:
46