न्यायालयीन याचिकेमुळे कोपरगाव निवडणूक स्थगित; विकास कामांवर विरोधक अडथळे आणत असल्याचा आरोप

न्यायालयीन याचिकेमुळे कोपरगाव निवडणूक स्थगित; विकास कामांवर विरोधक अडथळे आणत असल्याचा आरोप

Kopargaon election postponed due to court petition; Opposition accused of obstructing development works

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sun 30Nov 2.00Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीला स्थगितीचा आदेश लागल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. विकास कामांमध्ये अडथळे आणणे आणि न्यायालयीन प्रक्रियेचा वापर करून निवडणूक थांबवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार आशुतोष काळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी जनतेबरोबर संवाद साधतांना केला

रविवारी सकाळी साडेबारा वाजेच्या सुमाराचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास विनम्र अभिवादन केल्यानंतर ते जनतेसमोर बोलत होते

विकासकामात अडथळे आणल्याचा आरोप

आ.काळे म्हणाले की, त्यांनी पाच नंबर साठवून तलाव  बँक रोड, गुरुद्वारा रोड, धरणगाव रोड आदी विकास प्रकल्पांना विरोध करून न्यायालयीन कारवाई केल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगाने उमेदवारांचे अर्ज मंजूर करूनही विरोधकांनी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज रद्द करण्याचे अपील दाखल केल्याचे वक्तव्य केले.

“विकास प्रकल्पांना थांबवणे आणि निवडणुकीलाही स्थगिती आणणे हा जनतेच्या निर्णयापासून पळ काढण्याचा प्रयत्न आहे,” अशी खरमरीत टीका देखील  आमदार काळे यांनी केली.

लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेप”

यावेळी आ.काळे म्हणाले की निवडणुकीच्या प्रक्रियेत वारंवार हरकती घेऊन लोकशाहीला अडथळे आणले जात आहे न्यायालयाने अर्ज रद्द करण्याचा मागणी फेटाळल्यानंतरही निवडणुकीवर स्थगिती आणण्यासाठी पुन्हा प्रयत्न झाल्याचे वक्तव्य करतानाच हा लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेप असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. त्यांनी सांगितले की:“जनतेसमोर आमच्याकडे विकासाची कामे दाखवण्यास आहेत, त्यामुळे आम्ही प्रचार सुरू ठेवू. न्यायालयाचा निकाल काहीही असला तरी जनतेच्या निर्णयावर आमचा विश्वास असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी शेवटी सांगितले आहे.”

काका कोयटे यांचा विरोधकांवर हल्लाबोल

निवडणूक स्थगितीच्या निर्णयावर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे यांनी विरोधकांवर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार विरोधकांकडे विकासाच्या प्रश्नांना उत्तर नसल्यामुळे वारंवार न्यायालयीन मार्गाने अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. “निवडणुकीच्या मैदानात पराभव दिसू लागल्याने प्रक्रिया थांबवण्याचे प्रयत्न होत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.

संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करतांना काका कोयटे म्हणाले “लोकशाही ही जनतेची ताकद आहे आणि ती उद्ध्वस्त करण्याचा कुणाचाही प्रयत्न आम्ही कधीच यशस्वी होऊ देणार नाही. जनतेने त्यांचा कावा वेळेवर ओळखला आहे. आम्ही घाबरणारे नाही, हार मानणारे नाही. न्यायालयाच्या दारात जाऊन सत्याचा विजय आम्ही एकदा पाहिलाच आहे, पुन्हा एकदा पाहू. निवडणुका कितीही वेळा लावा, कितीही अडथळे उभे करा, राष्ट्रवादी काँग्रेसचा विकासाचा रथ अजित दादांच्या मार्गदर्शनाने आणि आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली पुढेच जाणार आहे. ही जनता आमच्यावर विश्वास ठेवते आणि कोपरगावची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडे येणारच, यात आज कोणतीही शंका नाही.”

प्रचार सुरू ठेवण्याचे आवाहन

नेत्यांनी सर्व कार्यकर्त्यांना प्रचार मोहीम थांबवू नये, घरोघर जाऊन मतदारांशी संवाद ठेवण्याचे आवाहन आमदार आशुतोष काळे व काका कोयटे यांनी केले. निवडणूक स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

Leave a Reply

You cannot copy content of this page