पंजाबी हिंदू व शीख बांधवांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवणार – आ. आशुतोष काळे
Will convey the sentiments of Punjabi Hindu and Sikh brothers to the government – MLA Ashutosh Kale
बाबा पीर रतन नाथ मंदिर तोडफोड प्रकरणी कोपरगावात निषेध मोर्चा
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Tue 9Dec 19.10Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : दिल्ली येथे झंडेवालान परिसरातील बाबा पीर रतननाथ मंदिरांची महानगर पालिकेकडून झालेल्या तोडफोडीच्या घटनेचा कोपरगावातील पंजाबी हिंदू व शीख बांधवांनी जोरदार निषेध व्यक्त केला. या निषेध मोर्चात आमदार आशुतोष काळे सहभागी झाले असून, या अन्यायकारक कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करत समाजाच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याची ग्वाही त्यांनी दिली.
कोपरगावातील पंजाबी हिंदू व शीख समाजाने प्रभू श्रीरामांचे दर्शन घेत श्रीराम मंदिर ते तहसील कार्यालय असा शांततेत मोर्चा काढला. नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांना निवेदन देऊन दिल्लीतील धार्मिक स्थळ तोडफोडीचा कडक निषेध नोंदवण्यात आला.
यावेळी आ. आशुतोष काळे यांच्या सोबत राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंदिर तोडफोडीबाबत बोलताना आ. काळे म्हणाले, “दिल्लीतील ही घटना अतिशय दुर्दैवी असून पंजाबी हिंदू व शीख बांधवांच्या भावना दुखावणारी आहे. या प्रकरणी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून समाजाच्या भावना नमूद केल्या आहेत. त्या जमिनीवर योग्य निर्णय घेण्याची मागणी देखील केली आहे.”
तसेच पुढे त्यांनी समाजाला आश्वासन दिले की, “लोकप्रतिनिधी म्हणून मी सदैव आपल्या सोबत आहे. तुमच्या भावनांचा आदर राखण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी मी ठामपणे उभा राहीन.”
Post Views:
35






