कोपरगावात राष्ट्रवादीचीच लाट; पराभव जाणवताच भाजप सैरभैर – शिवाजी ठाकरे
Kopargaon NCP’s wave; BJP’s discontent as soon as it feels defeat – Shivaji Thackeray
निवडणूक केवळ औपचारिकता; वैयक्तिक टीकेचा खालचा स्तर गाठणाऱ्या विरोधकांवर राष्ट्रवादीची झंझावाती टीका
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Wed 10Dec 13.00Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : “कोपरगावची निवडणूक जिंकणे हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी आता फक्त औपचारिकता आहे. पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने भाजप पूर्णपणे सैरभैर झाली आहे,” अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवाजी ठाकरे यांनी केली.
“साई तपोभूमी” येथे बुधवारी (१०) रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोधकांवर टोकाची टीका करताच वातावरण तापले.
यावेळी युवक जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा आढाव, शहराध्यक्ष सुनील गंगुले, वीरेन बोरावके, प्रकाश दुशिंग, विजय त्रिभुवन, अशोक आव्हाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
“आशुतोष काळेंचा ‘राजकीय बॉम्बस्फोट’; भाजप कोमात!”
ठाकरे म्हणाले, “आमदार आशुतोष काळेंनी काका कोयटे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देताच विजय साजरा करणारे विरोधक थेट कोमात गेले. आका, ‘बोका बाहेरचा की आतला’ अशा विचित्र आरोपांची टीका टिप्पणी भाजपकडून सुरू आहे.”
निवडणूक आयोगाने ३० प्लस वन उमेदवारांच्या बाजूने दिलेला निकाल वेळेपूर्वी लागल्याने कोपरगावची निवडणूक २० दिवस पुढे ढकलली गेली. यावर टीका करत ठाकरे म्हणाले, “हे पाप स्पष्टपणे भाजपचे. स्वतःच्या पराभवाची चाहूल लागताच न्यायालयात धाव घेऊन विकासकामांना फाटा देण्याचे काम विरोधकांनी केले.”
ते पुढे म्हणाले, “आता वाळू सरकली म्हणण्यापेक्षा वाळूच उरलेली नाही. पराभव जवळ येताच कोयटे कुटुंबावर वैयक्तिक टीकेचे षडयंत्र रचले जात आहे.”
सुनील गंगुले : “३० + १ उमेदवार निवडून येणार,म्हणून विरोधकांमध्ये हताश”
शहराध्यक्ष गंगुले म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसचे ३० प्लस वन उमेदवार निवडून येणार हे चित्र स्पष्ट दिसताच विरोधक जातीयवादाच्या आडून टिका करण्यापेक्षा सुरुवात केली आहे.”
ते पुढे म्हणाले, “समतेचा डंका पिटणारे हेच लोक आंबेडकरांच्या महानिर्वाण दिनी चषकाची वाजत गाजत मिरवणूक काढून गाजावाजा करीत होते. त्यांनी याबाबत न बोललेलेच बरे.”
“कमळावर तीस माणसे उभी राहू शकली नाहीत!”
गंगुले यांनी विरोधकांना खुले आव्हान दिले “आंबेडकर मैदानावर या, आम्ही केलेली कामे दस्तऐवजांसह दाखवू. तुम्ही काय दिवे लावले तेही दाखवा. ज्यांना कमळावर ३० माणसे उभी करता आली नाहीत, ते विकासाच्या भाषेत बोलतायत, हे विनोदी आहे.”
प्रकाश दुशिंग : “पक्षातील स्थान ओळखा; नाहीतर जशास तसे उत्तर मिळेल”
“समता अभ्यासिकेवर टीका करणाऱ्यांनी आपले राजकीय वजन आधी मोजावे,” असा टोला प्रकाश दुशिंग यांनी लगावला.
ते म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयासाठी काका कोयटे यांनी लाखो रुपयांची पुस्तके दिली. गरीब मुलांना अभ्यासाची संधी मिळावी म्हणून ‘समता’ सुरू केली, यात वावगे काय? समाज सुज्ञ आहे. त्याला कोणी बांधून ठेवू शकत नाही.”
कृष्णा आढाव : “विरोधकांचे आरोप अर्थहीन; निवडणूक विकासावर व्हावी”
कृष्णा आढाव म्हणाले, “संस्था चालवताना छोट्या मोठ्या चौकशा होतातच, स्वर्गीय शंकरराव काळे व स्वर्गीय शंकरराव कोल्हे हे आदरणीय नेते होते, आहेच, आणि राहतीलही जनतेसाठी त्यांच्यावर केसेस झाल्या,जनतेच्या कामात केसेस होतच असतात या संदीप कोयटे यांच्या बोलण्याचा विपर्यास करून राजकारण करणे हा विरोधकांचा परंपरागत स्वभाव आहे
ते म्हणाले, “आमदारांनी काय केले ते सोडा, तुम्ही काय करणार ते सांगा, पराभवाची भीती वाटताच विरोधक नव्या मुद्द्यांना भरकटत नेत आहे.”
वीरेन बोरावके : “कोर्टात हरले, मुद्दे संपले… आता रडारड सुरू”
बोरावके म्हणाले, “कोर्टात पराभव झाल्यानंतर विरोधकांकडे बोलण्यासारखे काहीच उरले नाही. म्हणून आता वैयक्तिक टीकेचा ‘रडीचा डाव’ सुरू आहे.”
ते म्हणाले, “निवडणुकीची लढाई मैदानातील असते ती मैदानातच झाली पाहिजे; पण विरोधक जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जनता भुलथापांना भुलणार नाही, जनता आता विकासालाच मत देणार.”
शेवटी आभार अशोक आव्हाटे यांनी मानले.
Post Views:
38