विश्वासनाम्यावर जनतेची मोहर; ऐतिहासिक विजय निश्चित-पराग संधान 

विश्वासनाम्यावर जनतेची मोहर; ऐतिहासिक विजय निश्चित-पराग संधान 

The public has stamped its approval on the manifesto; a historic victory is certain – Parag Sandhan

फक्त मतदानाची औपचारिकता उरली – पराग संधानांचा विश्वास

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनSat 13Dec 19.00Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप व मित्रपक्ष लोकसेवा आघाडीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. शहरभर मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आता केवळ मतदानाची औपचारिकता उरली असून ऐतिहासिक विजयाकडे आमची घोडदौड सुरू आहे, असा ठाम विश्वास नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांनी व्यक्त केला आहे.कर्य

प्रामाणिक, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार हेच आमचे धोरण असून जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून लढण्याची आमची तयारी आहे. प्रत्येक प्रभागात आमचे उमेदवार सक्रियपणे कार्यरत असून प्रचारादरम्यान नागरिकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद हा जनतेचा वाढता विश्वास दर्शवतो, असे संधान म्हणाले.

रस्त्यांची दुरवस्था, धूळ नियंत्रण, आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी, स्वच्छता यासोबतच पर्यटन विकास आणि शहर सुशोभीकरणासाठी सादर करण्यात आलेला विश्वासनामा नागरिकांच्या मनाला भावला आहे. या विश्वासनाम्याला हजारो कोपरगावकरांनी जाहीर पाठिंबा दिल्याने आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे.

शहरातील सर्व घटक आमच्याशी हक्काने जोडले गेले असून अनेक वर्षांच्या निस्वार्थ सेवेचे हे फळ आहे. याच विश्वासाच्या जोरावर सर्व ३० नगरसेवकांसह नगराध्यक्षपदावरही विजयाचा गुलाल आमच्या अंगावर कोपरगावकर उधळतील, असा ठाम विश्वास पराग संधान यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page