“जे बोलतो ते करतो, आणि जे करणार तेच सांगतो” – पराग संधानांचा ठाम शब्द

“जे बोलतो ते करतो, आणि जे करणार तेच सांगतो” – पराग संधानांचा ठाम शब्द

“I do what I say, and I only say what I will do” – Parag Sandhana’s firm words.

कोपरगावसाठी शब्द–कृतीतील अंतर मिटवणारा ‘विश्वासनामा’; मोठ्या मताधिक्याचा विश्वास

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनSat 13Dec 10.20Am.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव :राजकारणात आश्वासनांची भरमसाठ पेरणी केली जाते; मात्र आम्ही शब्द आणि कृती यामध्ये कधीही अंतर ठेवत नाही. मी जे बोलतो ते करतो आणि जे करणार आहे तेच थेट जनतेसमोर मांडतो, असे ठाम प्रतिपादन भाजपा मित्रपक्षांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांनी केले. प्रचारादरम्यान शहरात आजच विजयाचा माहोल असल्याचे सांगत, मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर युवा नेते विवेक कोल्हे उपस्थित होते.

कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामान्य नागरिकांच्या रोजच्या अडचणी समजून घेण्यासाठी जनतेच्या थेट सहभागातून विश्वासनामा तयार करण्यात आला आहे. हा दस्तावेज कोणत्याही बंद दालनात नाही, तर शहरातील नागरिक, व्यापारी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि विविध घटकांशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा, समस्या व सूचना ऐकून उभा राहिल्याचे संधान यांनी स्पष्ट केले.

शहरातील रस्त्यांची दुरवस्था, धूळ, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, शिक्षण, वाहतूक, बाजारपेठेतील सुविधा, महिला व ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता अशा अनेक लहान-मोठ्या प्रश्नांवर व्यवहार्य, ठोस आणि वेळेत पूर्ण होणाऱ्या उपाययोजना विश्वासनाम्यात समाविष्ट आहेत. केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर आमचा भर असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.

सामान्य माणसाच्या छोट्या वाटणाऱ्या समस्या प्रत्यक्षात त्याच्या दैनंदिन जगण्याशी जोडलेल्या असतात. त्या सोडवणे हीच खरी लोकसेवा असल्याचे सांगत, या प्रश्नांवर विधायक, पारदर्शक आणि परिणामकारक उपाय राबवण्याची ग्वाही संधान यांनी दिली.

कोपरगावच्या विकासासाठी राजकारणापेक्षा काम, विश्वास आणि संवाद या त्रिसूत्रीवर आधारित कार्यपद्धती स्वीकारली असून, जनतेने दिलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. जनतेच्या सहभागातून उभा राहिलेला हा विश्वासनामा म्हणजेच कोपरगावच्या उज्ज्वल भविष्याचा भक्कम पाया असल्याचे पराग संधान यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page