विवेक कोल्हेंचा पलटवार पेल्यातील वादळ; विरोधकांचा डाव उधळून “शह आणि मात” एकाचवेळी

विवेक कोल्हेंचा पलटवार पेल्यातील वादळ; विरोधकांचा डाव उधळून “शह आणि मात” एकाचवेळी

Vivek Kolhe’s counterattack was a storm in a teacup; he thwarted the opponents’ plan and delivered a checkmate in a single move.

विवेक कोल्हे व पराग संधानांनी पोलिसांकडे तातडीने लेखी निवेदन दिले; ऐन निवडणुकीच्या काळात विरोधकांचा राजकीय डाव फेल

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनSat 13Dec 19.30Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव : नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात,शहरातील एका खाजगी संस्थेच्या कर्मचाऱ्यावर झालेल्या मारहाणीचा विरोधकांकडून राजकीय भांडवल सुरू होताच, भाजपा व मित्रपक्षांनी ताबडतोब ठोस पाऊल उचलले. विवेक कोल्हे आणि नगराध्यक्ष उमेदवार पराग संधान यांनीमित्रपक्षासह  थेट पोलीस स्टेशन गाठून घटनेचा सखोल तपास करण्याची लेखी मागणी केली. ह्या कृतीमुळे विरोधकांचा डाव उधळला गेला, शह व मात एकाचवेळी दिली गेली आणि त्यांच्या तोंडाला कुलूप बसल्याची, चर्चा शहरभर आहे.

भाजप व मित्रपक्षांच्या निवेदनात म्हटले आहे की, विकासाच्या मुद्द्यांवर जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी, तसेच काही उमेदवारांभोवती सुरू असलेल्या गैरप्रकारांवर पडदा टाकण्यासाठी ही घटना जाणीवपूर्वक घडवली गेली का, याची चौकशी होणे गरजेचे आहे. मारहाणी झालेल्या बाबासाहेब ठोंबरे हे जरी विशिष्ट संस्थेचे कर्मचारी असले, तरी त्यांचे कुटुंब कोल्हे कुटुंबाशी सामाजिकदृष्ट्या अनेक वर्षांपासून जोडलेले आहे. त्यामुळे घटनेतील सर्व पैलू, संबंध आणि उद्देश सखोल तपासणे अत्यंत आवश्यक आहे, असेही मत या वेळी मांडले गेले.

विवेक कोल्हे यांनी स्पष्ट केले की, हल्ला नेमका कोणाचा होता, त्यामागचा उद्देश काय होता, हे जनतेसमोर आणणे गरजेचे आहे. शहरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था दूषित करून राजकीय फायदा घेण्याचा कोणाचा डाव आहे का, या धाग्यानेही तपास व्हावा. पोलिसांनी तातडीने, पारदर्शक आणि कठोर कारवाई करावी,अशी ठाम अपेक्षा व्यक्त करण्यात केली आहे.ऐन निवडणुकीच्या काळात हाणामारीच्या नावाखाली उठणारे राजकीय वादळ विवेक कोल्हे यांच्या ठाम कृतीमुळे पेल्यातील वादळ ठरले आणि विरोधकांचा डाव उधळून शह व मात एकाचवेळी देऊन त्यांचे तोंडघशी पाडले, याची जोरदार चर्चा शहरभर  आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page