समता’च्या सामाजिक कार्यातून सक्षम नेतृत्व उभं – काकासाहेब कोयटे नगराध्यक्षपदासाठी योग्यच!
Strong leadership emerges from ‘Samata’s’ social work – Kakasaheb Koyte is indeed the right choice for the post of Municipal President!
कॉर्नर सभांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे विजयाची नांदी – आ. आशुतोष काळे
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनTue 16Dec 11.00Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :कोपरगाव शहरातील सामाजिक कार्याची ठाम ओळख असलेले काकासाहेब कोयटे हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून, समता संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शहरातील प्रत्येक घटकांशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण केलं आहे. गरजू, असहाय्य, वृद्ध, अपंग आणि गोरगरीब कुटुंबांसाठी अखंडपणे राबवलेली अन्नप्रसाद सेवा, शिर्डीतील अनाथ आश्रम, कोपरगावातील समतेची भिंत यांसारखे उपक्रम त्यांच्या सामाजिक बांधिलकीची साक्ष देतात. याच कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली असल्याचं प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केलं.
कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ०८ व ०९ येथे झालेल्या कॉर्नर सभेत आ. काळे यांनी थेट नागरिकांशी संवाद साधला. या सभांना कोपरगावकरांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा बदलाची आणि विजयाची नांदी असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं.“राजकारणाच्या पलीकडे जाऊन जो व्यक्ती समाजासाठी झटतो, त्याच्याकडे नगराध्यक्षपदाची जबाबदारी देणं म्हणजे शहराच्या विकासाला गती देणं,” असं सांगत काकासाहेब कोयटे यांच्यावर जनतेचा विश्वास असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं.
आ. काळे यांनी आपल्या विकासात्मक कामांचा आढावाही घेतला. कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नावर निर्णायक पाऊल उचलत ५ नंबर साठवण तलावासाठी १३१ कोटींचा निधी मंजूर करून घेतला. विशेष म्हणजे शासनाकडे द्यावा लागणारा १५ टक्के वाटा माफ करून १०० टक्के निधी राज्य शासनाकडून मिळवून देणारी कोपरगाव ही महाराष्ट्रातील एकमेव नगरपालिका असल्याचं त्यांनी ठासून सांगितलं. या निधीची झळ नागरिकांना बसू दिली नाही, हा विश्वासही त्यांनी दिला.
“राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांचे सहकार्य कोपरगावच्या विकासासाठी नेहमीच मिळत राहील. जसा चाळीस वर्षांचा पाणी प्रश्न शब्द दिल्याप्रमाणे सोडवला, तसाच येत्या चार वर्षांत शहरातील सर्व विकासाचे प्रश्न मार्गी लावू,” असा ठाम विश्वास आ. काळे यांनी व्यक्त केला.
त्यामुळे कोपरगावच्या सर्वांगीणविकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नगरपरिषदेची सत्ता द्या, असं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं.
Post Views:
43





