कोपरगाव शहराला‘एक दिवसाआड स्वच्छ पाणी’हाच अजेंडा; राजेंद्र झावरे
The agenda for Kopargaon city is ‘clean water every other day’; says Rajendra Zhavare.
एकनाथ शिंदेंची आज कोपरगावात तोफ धडाडणणार
निधीची चावी आमच्याच हातात; झावरे, लोखंडे, औताडेंचा विरोधकांवर थेट हल्लाबोल
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनThu 18Dec 19.10Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :“कोपरगावच्या अनेक समस्या आहेत; पण माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे शहराला स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी. निवडून आलो तर एक दिवसाआड स्वच्छ पाणी देण्याचे व्हिजन मी प्रत्यक्षात आणेन,” असा ठाम निर्धार शिवसेना (शिंदे गट) नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र झावरे यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आज (शुक्रवार, १९) सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
झावरे यांनी विद्यमान व्यवस्थेवर थेट बोट ठेवले. “शहराला येणारे पाणी अशुद्ध आहे. लोक नळाचे पाणी पिण्याऐवजी जारचे पाणी वापरतात, हीच पाण्याच्या गुणवत्तेची कबुली आहे. नांदूर मधमेश्वर धरणातून ग्रॅव्हिटी पद्धतीने पाणी बंदिस्त पाईपलाईनमधून आणणे हे माझे प्राधान्य राहील,”असे त्यांनी स्पष्ट केले. जलशुद्धीकरण केंद्रावरही त्यांनी शंका उपस्थित केली.
राजकीय टोलेबाजी करतांना झावरे म्हणाले, “सातबारा देण्याच्या घोषणा ऐकून समाधान वाटले; तीस वर्षांनंतर का होईना लोकांना घर देण्याची काहींना आठवण झाली. मात्र नगरपालिकेला निधी कुठून येतो, हे विसरू नका,नगरविकास खाते आमच्या पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.”
माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी सभेचे महत्त्व अधोरेखित करताना, “देवळाली प्रवरा, नेवासा, कोपरगावच्या जनतेच्या आग्रहामुळेच अंतिम टप्प्यात ही सभा आयोजित करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेसोबत आज लाडका भाऊ, सर्वसामान्यांचा नेता एकनाथ शिंदे कोपरगावात येत आहेत. महिलांनी मोठ्या संख्येने सभेला यावे,” असे आवाहन केले. “आमचे उमेदवार सर्वसामान्य आहेत; निवडून आल्यावर त्यांच्या हाताला धरून कामे सांगता येतील करून घेता येतील. इतर उमेदवार साखरसम्राटांचे त्यांच्या सांगण्याशिवाय काही होणार नाही,” असा घणाघातही त्यांनी केला.
जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनी पन्नास वर्षांच्या अपयशावर बोट ठेवले. “प्रस्थापितांच्या बगलबच्च्यांकडे सत्ता आलटून पालटून राहिली; मूलभूत प्रश्न सुटले नाहीत. आमचे उमेदवार “ऑन द स्पॉट” निर्णय घेणारे आहेत. झावरे यांनी ठळक, बोलकी कामे केली आहेत.त्याची पावती विरोधकही देतात,” असे सांगत त्यांनी विकासाची रूपरेषा मांडली.स्विमिंग पूल, धूळमुक्त शहर, दर्जेदार रस्ते, नाविन्यपूर्ण पार्क, उद्ध्वस्त बाजारपेठेला पुन्हा गतवैभव.
शेवटी, “निधीची चावी आमच्याच हातात आहे. शिवसेनेची सत्ता जिथे, तिथे विकास भरभरून,” असा विश्वास व्यक्त करत एकनाथ शिंदे यांच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
Post Views:
90





