उन्हाळी सिंचनासाठी दिलासा; अर्ज मुदत २० एप्रिलपर्यंत वाढली
Relief for Summer Irrigation: Application Deadline Extended to April 20
आ. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्याला यश; शेतकऱ्यांमध्ये समाधान
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Apr 13Mon19.20 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :उन्हाळी सिंचन आवर्तनापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झालेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर पाटबंधारे विभागाने सात नंबर पाणी मागणी अर्ज भरण्याची अंतिम मुदत २० एप्रिलपर्यंत वाढविली आहे.
गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी अर्जाची अंतिम मुदत २७ मार्च निश्चित करण्यात आली होती. मात्र विविध कारणांमुळे अनेक शेतकरी अर्ज भरू शकले नव्हते. दरम्यान, वाढत्या उन्हामुळे उभ्या पिकांना, फळबागांना व चारा पिकांना पाण्याची तीव्र गरज निर्माण झाली होती.
ही परिस्थिती लक्षात घेऊन आमदार काळे यांनी तातडीने हस्तक्षेप करत मुदतवाढीची मागणी केली होती. त्यानुसार विभागाने सकारात्मक निर्णय घेतल्याने अर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेत अर्ज तातडीने संबंधित कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. या निर्णयामुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Post Views:
2





