स्वामी समर्थ नामजपातून भक्तीचा महासागर; निवारा -सुभद्रानगरात सप्ताहाची भावपूर्ण सांगता
An Ocean of Devotion Through the Chanting of Swami Samarth’s Name; A Soulful Conclusion to the Week-long Observance in Subhadranagar
मान्यवरांची उपस्थिती; अखंड नामजप, याग-हवनांनी परिसर भक्तिमय
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Apr 15Mon10.20 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सुभद्रानगर-निवारा येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात आयोजित अखंड नामजप यज्ञ, गुरुचरित्र पारायण व विविध धार्मिक सेवांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ९ ते १५ एप्रिल या कालावधीत पार पडलेल्या सप्ताहात भक्तीमय वातावरण अनुभवास आले.
या सप्ताहात श्री गुरुचरित्र पारायणासाठी एकूण २७४ वाचकांनी (२४२ पुरुष व ३२ स्त्रिया) सहभाग नोंदविला. एक एक भागवत एक नवनाथ पारायण करण्यात आले. तसेच १४४ सेवेकऱ्यांनी अखंड नामजप, अखंड प्रहर सेवा व श्री स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचे अखंड वाचन केले. दररोज गुरुचरित्र वाचन, त्रिकाल महानैवेद्य आरत्या तसेच विविध याग-हवन विधी पार पडले. यामध्ये श्री गणेश याग, मनोबोध याग, चंडी याग, स्वामी याग, विष्णू याग, गीताई याग, मल्हार याग व रुद्र याग यांचा समावेश होता.
सप्ताह सांगतेप्रसंगी सेवेकऱ्यांचा सन्मान केंद्रप्रमुख हरिभाऊ गिरमे, अरविंद रुईकर व राजेंद्र निकुंभ यांच्या हस्ते करण्यात आला. यज्ञ विभागाचे कामकाज बाळकृष्ण पांगारकर शास्त्री यांनी पाहिले, सप्ताह काळामध्ये ॲड. जयंत जोशी यांनी मार्गदर्शन सेवा दिली. तर महेश गावंड यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन उमेश बोढरे यांनी केले.
सप्ताहाच्या काळात नगराध्यक्ष पराग संधान, माजी नगराध्यक्ष सुहासिनी कोयटे, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे व नगरसेवक वैशाली वाजे, निर्मला आढाव यांनी भेट देत श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हरिभाऊ गिरमे, अरविंद रुईकर, राजेंद्र निकुंभ, अनिल थोरात, दिनकर बोरणारे, नानासाहेब राशिनकर, सुनील गगे, परशुराम चतुर, नरेंद्र बैरागी, रोकडे नाना, शांतीलाल यादव, महेश गोसावी, रावसाहेब होन, शशिकांत शेळके पाटील, गोकुळ कडलग, महेश गावंड, उमेश बोढरे, आदित्य डुचे, गौरव तनपुरे, दिनेश कृष्णा शेंडगे, प्रशांत दीपक सूर्यवंशी, अक्षय माळवे, साई विजय शिंदे, योगेश जगन खोसे, कुणाल पवार व विवेक फरताळे आदींनी परिश्रम घेतले. सप्ताहाच्या निमित्ताने परिसरात श्रद्धा, भक्ती व एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले.
Post Views:
9









