सुभद्रानगरात सभामंडपावरून श्रेयवादाचा स्फोट; कोल्हे–काळे गट आमने-सामने;

सुभद्रानगरात सभामंडपावरून श्रेयवादाचा स्फोट; कोल्हे–काळे गट आमने-सामने;

Credit-claiming row erupts over community hall in Subhadranagar; Kolhe and Kale factions face off.

निधी आमचा की जनतेचा?”; मंदिरातच राजकीय रणांगण

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Apr 19Sun15.20 Am.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव  : सुभद्रानगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या सभामंडप व सांस्कृतिक भवन उभारणीच्या कामावरून कोपरगावात श्रेयवादाचा भडका उडाला असून धार्मिक कार्यक्रमालाच उघड राजकीय रंग चढल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर युवा नेते विवेक कोल्हे व नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते पार पडलेल्या भूमिपूजन सोहळ्यात कोल्हे आणि काळे गट आमने-सामने आल्याने वातावरण चांगलेच तापले.

या वादाची ठिणगी केवळ श्रेयापुरती मर्यादित न राहता जागेच्या प्रश्नावरूनही भडकली. आढाव कुटुंबियांच्या शेतीचे सुमारे ३०-३५ वर्षांपूर्वी बिगर शेतीकरण होऊन सुभद्रानगर वसाहत उभी राहिली. या वसाहतीतील सुमारे ५० ते ५५ गुंठे ओपन स्पेसपैकी १५ ते २० गुंठे जागा स्वामी समर्थ मंदिरासाठी देण्यात आली असून गेली दोन दशके येथे मंदिर सुरू आहे. याच ठिकाणी महाराष्ट्र पूर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत सुमारे ३७ लाख ७२ हजार रुपयांच्या निधीतून सभामंडप उभारणीचे काम हाती घेण्यात आले.
मात्र स्थानिक बाळासाहेब आढाव यांनी “आम्हाला निमंत्रण का नाही?” असा सवाल उपस्थित करत सभामंडपाची नेमकी जागा व मर्यादा स्पष्ट करण्याची मागणी केली. या प्रश्नावरूनच कार्यक्रमात वाद पेटल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, निधीसाठी आमदार आशुतोष काळे यांनी पाठपुरावा केल्याचा दावा काळे गटाकडून करण्यात आला. “निधी आमदारांचा, श्रेय दुसऱ्यांचे?” असा सवाल करत सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवण्यात आली. त्याला प्रत्युत्तर देताना कोल्हे गटाने “हा निधी जनतेचा आहे; कुणाच्या नावावर खपवू नका,” असा ठणकावून पलटवार केला. गेल्या चार वर्षांत प्रलंबित कामांना गती दिल्याचा दावा करत विरोधकांवर विकासात अडथळे आणल्याचा आरोप करण्यात आला.
काळे गटाने सत्ताधाऱ्यांवर “स्वतःच्याच हाताने स्वतःची पाठ थोपटण्याचा उद्योग” सुरू असल्याची टीका केली. या आरोप-प्रत्यारोपांदरम्यान दोन्ही गटांचे कार्यकर्ते, नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने आमने-सामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमास उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, बांधकाम सभापती निलोफरभाभी पठाण, राजेंद्र सोनवणे, रवींद्र पाठक, रवींद्र नरोडे, प्रसाद आढाव, विजय वाजे, वैभव गिरमे, योगेश बागुल, हरिभाऊ गिरमे, कलविंदर दडियाल, स्वप्निल मंजुळ, संतोष शिंदे, आकाश वाजे, नाना भुजबळ, संजय सातपुते, अतुलशेठ काले, अनिल आव्हाड, रवींद्र कथले, संतोष शेजवळ, गुरमित दडियाल, मयूर गायकवाड, सोमनाथ मस्के, विजया देवकर, पल्लवी दडियाल, राजेंद्र गायकवाड, राजेंद्र जाधव, अमोल अजमेरे, संजय उदावंत, दत्तू पगारे, विक्रमादित्य सातभाई, उमेश गोसावी, महेंद्र नाईकवाडे, निसार शेख, सिद्धार्थ साठे, रोहित कनगरे, रोशन शेजवळ, कुंदन भारंबे, धनंजय आढाव, भाऊसाहेब आढाव यांसह कोल्हे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.
तर काळे गटाकडून शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक जनार्दन कदम, निर्मला आढाव, नंदिनी कदम, सोमनाथ आढाव, मंदार पहाडे, सिद्धार्थ शेळके, महेश गोसावी, अनिरुद्ध काळे, अरुण जोशी, सचिन गवारे, रमेश गवळी, बाळासाहेब आढाव, आतिश बोरुडे, राजेंद्र बोरावके, योगेश वाणी, संदीप सावताडकर, अण्णा लोखंडे, विजय बागडे, गणेश गोसावी, बाळासाहेब रूईकर, रुपेश वाकचौरे, सुनील गलांडे, विलास ताम्हाणे, गौरी पटाडे, सचिन वैष्णव, मायाताई खरे, दिनकरराव खरे, इग्तीयाज अत्तार, शैलेश साबळे, वाल्मीक लहीरे, मयूर राऊत, शशीकांत शेळके, निलेश आढाव, चिन्मय नागरे, राकेश गवते, विजय त्रिभुवन, मुकुंद भुतडा, ऋषिकेश आढाव, राजेंद्र खैरनार, तन्मय साबळे, नाजीम शेख, प्रदीप कुऱ्हाडे, बाळू गोर्डे, जावेद शेख, अनिल नरोडे, विकी चांदर, संदीप कपिले, अमित आगलावे यांसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंदिरासारख्या पवित्र स्थळावर उभा राहिलेला हा श्रेयवाद आता उघड राजकीय संघर्षात बदलला असून भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विकासाच्या नावाखाली श्रेयासाठी चाललेली ही चढाओढ थांबली नाही, तर भविष्यात प्रत्येक कामावर असेच वाद उभे राहतील, हे स्पष्ट आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page