भूमिपूजनावरून कोपरगावात राजकीय ठिणगी; विवेक कोल्हेंवर दमबाजीचा आरोप

भूमिपूजनावरून कोपरगावात राजकीय ठिणगी; विवेक कोल्हेंवर दमबाजीचा आरोप

Political Spark Ignites in Kopargaon Over Groundbreaking Ceremony; Vivek Kolhe Accused of Intimidation

“योगदान नसताना श्रेयासाठी धडपड” – नगरसेवक जनार्दन कदमांचा हल्लाबोल; संतप्त नागरिकांचा विरोध

Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Apr 19 Sun 18.20 Am.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव  :सुभद्रानगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर, सभामंडप व परिसर सुशोभीकरणाच्या कामाच्या भूमिपूजनावरून कोपरगावात राजकीय वातावरण तापले असून, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्यावर नागरिकांना दमबाजी केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जनार्दन कदम यांनी केला आहे.

कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, आमदार आशुतोष काळे यांनी शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला असून, सुभद्रानगर येथील स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठीही सुमारे ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचे भूमिपूजन नगरपरिषदेच्या वतीने नियोजित असताना, कोणतेही योगदान नसताना श्रेय लाटण्यासाठी विवेक कोल्हे यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप त्यांनी केला.

रविवार (दि.१९) रोजी भूमिपूजनासाठी कोल्हे उपस्थित राहिल्यानंतर “ज्यांचे योगदान नाही, त्यांनी भूमिपूजन करू नये” अशी भूमिका घेत नागरिकांनी त्यांना विरोध केला. यामुळे संतप्त झालेल्या कोल्हे यांनी नागरिकांना दमबाजी केल्याचा प्रकार घडल्याचा दावा कदम यांनी केला असून, यामुळे स्वामी समर्थ भक्त आणि स्थानिकांमध्ये संताप उसळल्याचे त्यांनी नमूद केले.

नगरपरिषदेची सत्ता मिळाल्यापासून सत्ताधाऱ्यांकडून नागरिकांवर दबाव टाकण्याचे प्रकार वाढले असून, आता त्यात तथाकथित युवा नेतेही पुढे असल्याची टीका कदम यांनी केली. “अशीच दमबाजी सुरू राहिली, तर कोपरगावची जनता योग्य वेळी धडा शिकवेल,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, या आरोपांमुळे शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले असून, या प्रकरणावर संबंधितांकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page