‘‘३१-० करा, कोपरगावची जबाबदारी माझी’ – मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला साक्ष ठेवत १०० दिवसांत १०० कामांचे आश्वासन-पराग संधान
‘Make it 31-0, the responsibility of Kopargaon is mine’ – Keeping the Chief Minister’s words as a witness, Parag Sandhan promises 100 works in 100 days.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत उसळलेली गर्दी म्हणजेच विजयाची हमी – पराग संधानांचा आत्मविश्वास
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनFir19 Dec 9.30Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :“शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत जर सभा उसळली, तर ती नक्कीच विजयी सभा असते… आजची सभा त्याचीच साक्ष आहे!” अशा ठाम शब्दांत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांनी प्रचारसभेची सुरुवात करताच वातावरण तापवले. भाजप, आरपीआय व मित्रपक्षांच्या विश्वासनाम्यावर बोलताना संधान यांनी विकासाचा स्पष्ट आराखडा, विरोधकांवर रोखठोक सवाल आणि जनतेशी थेट नातं जोडणारी भूमिका मांडली.
संधान म्हणाले, “स्वच्छ पाणी, दर्जेदार रस्ते, आरोग्य सुविधा, शहरभर नवे गार्डन, गोदावरी संवर्धन, नदीकाठी वॉकिंग ट्रॅक – ही कामं कल्पनेतली नाहीत, तर विश्वासनाम्यातील ठोस वचनं आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या विश्वासनाम्याचं पालकत्व घेतलं असून ‘३१-० करा’ असं स्पष्ट आवाहन केलं आहे.”
१०० दिवसांत १०० कामं – घोषणांचा नव्हे, कामांचा अजेंडा
गोदावरी संवर्धन, रस्ते-स्वच्छता, पाणीपुरवठा अशी काही कामं आधीच सुरू असल्याचं सांगत, उर्वरित कामं १०० दिवसांत १०० कामं या धर्तीवर पूर्ण केली जातील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दोन वर्ग जमिनींना एक वर्ग मध्ये समावेश – ऐतिहासिक निर्णयाचा उल्लेख
दोन वर्ग जमिनी एक वर्गमध्ये आणणाऱ्या निर्णयामुळे हजारो कुटुंबांना दिलासा मिळाल्याची आठवण करून देत, या प्रक्रियेतील १० टक्के रकमेच्या मुदतवाढीसाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी जाहीर सभेतूनच केली.
हद्दवाढीतील भागांचा प्रश्न थेट मांडला
“हद्दवाढीत समाविष्ट भागांना निधी मिळाला, पण नागरी सुविधा मिळाल्या नाहीत,” असा आरोप करत, रस्ते, पाणी व स्वच्छतेसाठी विशेष निधी द्यावा, अशी ठाम मागणी संधान यांनी केली.
प्रभाग समित्या, ॲप आणि हेल्पलाईन – थेट जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयोग
प्रत्येक प्रभागात नागरिकांची समिती, तीन महिन्यांतून प्रत्यक्ष भेटी, तक्रारींसाठी मोबाईल ॲप व हेल्पलाईन – हा प्रयोग कोपरगावच्या राजकारणात नवा असल्याचं सांगत, “आम्ही जनतेच्या दारी जाणार,” असा दावा त्यांनी केला.
विरोधकांवर घणाघात
“२५ वर्षांत तुम्ही काय केलं?” असा थेट सवाल करत, पूर, कोरोना, घरपट्टीवाढ, अतिक्रमण कारवाई, धार्मिक-सामाजिक कार्यक्रम अशा प्रत्येक प्रसंगात भाजप व सहकारी रस्त्यावर उतरल्याचं त्यांनी ठासून सांगितलं.
अंतिम आवाहन
“नगराध्यक्षाला एक, नगरसेवकांना दोन – अशी तीन मतं कमळाला द्या. खाली बहुमत आणि वर नगराध्यक्ष, हे समीकरण जमलं तर कोपरगावचा विकास अटळ आहे,” असा विश्वास व्यक्त करत, कमळ, छत्री व मित्रपक्षांच्या चिन्हांवर मतदान करण्याचं आवाहन पराग संधान यांनी केलं.
परागसंधान यांचा आत्मविश्वास हा केवळ प्रचार नव्हता; तो विकासाचा जाहीरनामा होता – आणि कोपरगावच्या निवडणुकीत हीच आत्मविश्वास निर्णायक ठरण्याची चिन्हं स्पष्ट दिसत होती.
Post Views:
31