प्रशासकाच्या आडून सत्याधा-यांनी चार वर्षात नगरपालिकेचा कारभार भ्रष्टाचाराच्या दलदलीत लोटला- विवेक कोल्हे

प्रशासकाच्या आडून सत्याधा-यांनी चार वर्षात नगरपालिकेचा कारभार भ्रष्टाचाराच्या दलदलीत लोटला- विवेक कोल्हे

Under the guise of the administrator, those in power have plunged the municipal administration into a quagmire of corruption in four years – Vivek Kolhe

‘७५ कोटी खर्च, तरीही रस्ते उखडलेलेच; ३०० दिवसांत फक्त ६३ दिवस पाणी!’

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनFir19 Dec 9.40Am.By  सालकर राजेंद्र

 

कोपरगाव :नऊ वर्षांनंतर होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा जोर चढताना, भाजप उमेदवार विवेक कोल्हे यांनी प्रचार सभेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. “नगरपालिका अस्तित्वात नसताना चार वर्षे प्रशासकीय कारकीर्दीच्या नावाखाली कोपरगावचा कारभार भ्रष्टाचाराच्या दलदलीत लोटला गेला,” असा थेट आरोप करत त्यांनी आकडेवारीसह सत्ताधाऱ्यांची पोलखोल केली.

“शहरातील ७२ किलोमीटर रस्त्यांवर चार वर्षांत तब्बल ७५ कोटी रुपये खर्च झाले. म्हणजे एका किलोमीटरला जवळपास एक कोटी रुपये. तरीही रस्ते उखडलेले, गटारे रस्त्यावर आणि नागरिक त्रस्त,” असा सवाल कोल्हेंनी उपस्थित केला. बाजारात साडेसहा ते सात हजारांत मिळणारे पेव्हर ब्लॉक  काम नगरपालिकेने साडेअकरा ते बारा हजार रुपये दराने केल्याचे दाखवून, ‘टक्केवारीचे साम्राज्य’ उभे राहिल्याचा आरोपही त्यांनी केला.

पाण्यावर कोट्यवधी खर्च; नागरिक मात्र तहानलेले

“मागील ३०० दिवसांत शहराला फक्त ६३ दिवस पाणी मिळाले. एका दिवसाच्या पाणीपुरवठ्यावर जवळपास एक लाख रुपये खर्च दाखवला जातो. स्वच्छतेचा खर्च दोन कोटींवरून थेट चार कोटींवर नेण्यात आला. फिल्टरेशन प्लांटमध्ये मासे, शेवाळ वाढले आणि त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाला—किडनी, त्वचा, केसांचे आजार वाढले,” असे गंभीर मुद्दे त्यांनी मांडले.

स्मार्ट सिटी हुकली; रोजगाराच्या संधींना कात्री

कोल्हेंनी स्मार्ट सिटीचा मुद्दा पुन्हा उकरून काढत, “शिर्डी-कोपरगावदरम्यान येणारी ५ हजार एकरांची स्मार्ट सिटी काही लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळे हुकली. त्यामुळे १५ हजार युवकांच्या नोकऱ्या गेल्या,” असा आरोप केला. यूट्यूबवर जुने व्हिडिओ पाहण्याचे आवाहन करत त्यांनी विरोधकांचा दुहेरी चेहरा उघड केला.

‘कमळ फुलवा, सत्तेचा संपर्क साधा

“अकरा वर्षांपासून सत्ता केंद्रे एकाच बाजूकडे केंद्रीत आहेत. खऱ्या अर्थाने विकास हवा असेल, घरांचा प्रश्न, सातबारे, रोजगार, पाणी आणि रस्ते मार्गी लावायचे असतील तर भाजपचे कमळ फुलवणे गरजेचे आहे,” असे आवाहन त्यांनी केले.

महिलांना मोठा दिलासा; विश्वासनाम्यात ठोस आश्वासने

भाजपच्या विश्वासनाम्याचा उल्लेख करत कोल्हे म्हणाले, “महिलांच्या नावावर घर असल्यास ५० टक्के घरपट्टी व पाणीपट्टी माफी, तर पाल्य नगरपालिकेच्या शाळेत शिकत असल्यास २० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘पाणी नाही, तर बिल नाही’ हे आश्वासनही दिले आहे.”

शेरोशायरीतून विरोधकांवर टोला

सभेचा शेवट करताना कोल्हेंनी शेरोशायरीतून विरोधकांवर निशाणा साधत, तूम लाख कोशिश करो मुझे बदनाम करणे की,मैं जब जब बिखरा हुं दुगनी रफ्तार से निखरा हू“आम्हाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अनेक शक्ती काम करत आहेत; पण कोपरगावकरांनी ठरवलं तर कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही,” असा विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

You cannot copy content of this page