“महिला सक्षमीकरण ही घोषणा नाही, तर आमची ओळख आहे,’ – स्नेहलता कोल्हेंचा विरोधकांवर जोरदार पलटवार
‘Women’s empowerment is not just a slogan, but our identity,’ – Snehalata Kolhe’s strong counter-attack on the opposition.
आपला एकेरी उल्लेखातून टीका करणाऱ्यांना खडेबोल; रोजगार, पाणी व घरकुल प्रश्नांवर ठाम भूमिका
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनFir19 Dec 9.50Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :“लाडक्या बहिणी म्हणण्याआधी कधी कोणी महिलांचा खरंच विचार केला होता का?” असा थेट सवाल करत स्नेहलता कोल्हे यांनी विरोधकांच्या टीकेचा धारदार शब्दांत समाचार घेतला. भारतीय जनता पार्टीच्या सरकारने महिलांसाठी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांची यावेळी त्यांनी ठामपणे मांडणी केली.
“माझी राजकारणातील सुरुवात नाही, तर गेल्या २०–२५ वर्षांपासून समाजकारणातूनच माझं काम सुरू आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांशी जुळलेलं नातं हे स्वार्थाचं नाही, तर विश्वासाचं आहे,” असे सांगत कोल्हेंनी महिलांना भडकवण्याच्या प्रयत्नांवर टीका केली.
ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कोपरगाव औद्योगिक वसाहतीत सुरू करण्यात आलेल्या गारमेंट क्लस्टरमध्ये २५०–३०० महिला कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय ग्रामीण भागातील पहिल्या कॉल सेंटरमध्ये हजारो युवक-युवती व महिला रोजगारावर असल्याचे नमूद करत, “पराभवानंतरही आम्ही थांबलो नाही, उलट दुप्पट ताकदीने काम केलं,” असा ठाम दावा केला.
महिलांवर वैयक्तिक उल्लेख करून टीका करणाऱ्यांना फटकारताना कोल्हे म्हणाल्या, “मी न बोललेले शब्द माझ्या तोंडी घालून शहरात वातावरण भडकवण्याचा प्रयत्न केला जातो. या वयात अशी नीच पातळीची टीका शोभत नाही.”
शहराच्या स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी धरणातून पाणी देण्याच्या प्रयत्नांना अडथळे आणले गेले, असा आरोप करत त्यांनी सरकारवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. गजानन टिळक नगर, संजय नगर, सुभाष नगर, साईनगर, येवला रोड, लक्ष्मी नगर, खडकी, जिजामाता परिसरासह शहरातील हजारो रहिवाशांच्या शासकीय जमिनीच्या मालकी प्रश्नांवर मार्ग काढण्याची कळकळ त्यांनी व्यक्त केली.
“गरीबांसाठी धावणारा नगराध्यक्ष आणि कार्यक्षम नगरसेवक-नगरसेविका निवडा,” असे आवाहन करत स्नेहलता कोल्हे यांनी महिलांच्या कामावर टीका करणाऱ्या विरोधकांना नामोहरम केले.
‘महिला सक्षमीकरण ही घोषणा नाही, तर आमची ओळख आहे,’ असा ठाम संदेश त्यांनी या वेळी दिला.
Post Views:
31