‘राजेंद्र झावरे म्हणजे विकासाची हमी’ – एकनाथ शिंदे यांचा कोपरगावात निर्धार

राजेंद्र झावरे म्हणजे विकासाची हमी’ – एकनाथ शिंदे यांचा कोपरगावात निर्धार

‘Rajendra Zaware means a guarantee of development’ – Eknath Shinde’s assertion in Kopargaon.

भ्रष्टाचाराला आवर, विकासाला गती – शिंदेंचा स्पष्ट संदेश

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनFir19 Dec 21.00Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव : कोपरगाव शहर गेली वीस वर्षे विकासाच्या वनवासात आहे. हा वनवास संपवायचा असेल तर राजेंद्र झावरे यांना निवडून देणे गरजेचे आहे, असे ठाम आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कोपरगावातील जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार सदाशिव लोखंडे हे होते

यावेळी उमेदवार राजेंद्र झावरे यांनी शहरातील मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधले. सत्ताधारी असूनही तरुण बेरोजगार आहेत, मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत, ही शोकांतिका असल्याचे त्यांनी सांगितले.

सभेत बोलतांना नितीन औताडे म्हणाले की, शहरात तब्बल १५ ठिकाणी झोपडपट्ट्या असून गेल्या १५ वर्षांपासून केवळ आश्वासनांची खैरात सुरू आहे. पालिकेतील व्याज व दंड १०० टक्के माफ करावा, तसेच बेकायदेशीररीत्या लाटलेली ५० एकर जमीन नगरपालिकेला वर्ग केल्यास नव्या प्रकल्पांद्वारे १४०० टपरीधारकांचे पुनर्वसन शक्य होईल, असा ठोस प्रस्ताव त्यांनी मांडला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात लाडकी बहीण योजनेबाबत ठाम भूमिका मांडली.“लाडक्या बहिणींना कोणीही फसवू शकत नाही. कोणी मायकल लाल आला तरी ही योजना बंद होणार नाही. योग्य वेळी २१०० रुपये देणारच आणि बहिणींना स्वावलंबी, लखपती करणारच,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.

आपल्या आयुष्याचा दाखला देत ते म्हणाले,
“एक शेतकरी, रिक्षावाला मुख्यमंत्री झाला हे काहींना पचले नाही; पण मी उत्तर भाषणातून नाही, कामातून दिले आहे. शासन लोकांच्या दारात नेणारे सरकार आपले आहे.”

शिक्षणासाठी मुलींना आत्महत्या करावी लागत असेल तर अशा व्यवस्थेचा काय उपयोग, असा सवाल उपस्थित करत शिंदे यांनी मुलींसाठी १०० टक्के फी माफी देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

कोपरगावच्या विकासाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की,नियमित पाणीपुरवठा, खड्डेमुक्त व धूळमुक्त रस्ते,गटारी, उद्याने, मैदाने,झोपडपट्टीधारकांना हक्काची घरे, १४०० टपरीधारकांना न्याय‌ हे सर्व काम नगरविकास खात्याच्या माध्यमातून पूर्ण केले जाईल.

मी घोषणा करणारा नेता नाही, मी काम करणारा कार्यकर्ता आहे.योजना कागदावर नाही, घराघरात पोहोचवतो.‌शब्द दिला की माघारी फिरत नाही नगराध्यक्ष द्या, सत्ता द्या…कोपरगावच्या विकासाचा पंचप्राण धनुष्यबाण धनुष्यबाण !”

“विरोधक भाषणात शिव्या देतात,आम्ही कामातून उत्तर देतो.४५० कोटीं दिले योजना,
६०–७० हजार रुग्णांना त्याचा फायदा झाला ,शिक्षण, पाणी, रस्ते हे बोलण्याचे नाही, दाखवण्याचे राजकारण आहे!”

“खरा कार्यकर्ता घरात बसत नाही,
तो दारात उभा राहून जनतेचं काम करतो.
मी मालमत्ता नाही कमावली,मी माणसं कमावली तसेच झावरे यांनी देखील माणसे कमवली म्हणूनच कोपरगाव त्यांच्या पाठीशी उभा आहे.”

“झावरे यांनी “जात-पात न पाहता हक्काचे गाळे  देऊन मुस्लिम समाजालाही न्याय दिला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा लढवय्या उमेदवार म्हणूनच राजेंद्र झावरे यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे,” असे शिंदे म्हणाले.

शेवटी त्यांनी ठाम शब्दांत सांगितले,“राजेंद्र झावरे यांना दिलेले मत म्हणजे विकासाला दिलेले मत आहे. आज मतदान द्या,उद्या दिव‌साआड पाणी मिळेल,आज विश्वास ठेवा,उद्या विकास दिसेल,मी शब्द देताना विचार करून देतो आणि दिलेला शब्द पूर्ण केल्याशिवाय राहत नाही.” एक बार मैंने कमिटमेंट कर दी फिर अपने आप की भी नहीं सुनता नही

यावेळी व्यासपीठावरआमदार अमोल खताळ, जिल्हाप्रमुख नितीन औताडे, बाळासाहेब राहणे, महिला जिल्हाप्रमुख विमल पुंडे, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव, मनिल नरोडे, अक्षय जाधव,सनी गायकवाड आदींसह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र झावरे सर्व प्रभागातील शिवसेनेचे नगरसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी आणि जनसमुदाय उपस्थित होता. सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले तर मकरंद जोशी यांनी आभार मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page