नगराध्यक्ष पराग संधानच्या विजयासाठी   प्रभाग ३ व १५ निर्णायक ठरले

नगराध्यक्ष पराग संधानच्या विजयासाठी   प्रभाग ३ व १५ निर्णायक ठरले

Wards 3 and 15 proved decisive in Mayor Parag Sandhan’s victory.

बालेकिल्ल्याला सुरूंग ४०९ मतांचा कौल :  रणनीतीचे यश

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनTue23 Dec 9.00Am.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव:कोपरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक ही केवळ आकड्यांची बेरीज-वजाबाकी नव्हती, तर ती प्रभागनिहाय राजकीय रणनीती, स्थानिक नेतृत्वाची ताकद, मतविभाजन आणि अंतिम टप्प्यातील निर्णयक्षम हालचाली यांचा परिणाम ठरली.

१५ प्रभागांतील एकूण मतांच्या आधारे भाजप मित्र पक्षांचे उमेदवार पराग संधान यांनी ४०९ मतांनी विजय मिळवला, मात्र या विजयामागील राजकीय गणित अधिक सूक्ष्म आणि अर्थपूर्ण आहे.

थेट लढत : कमळ विरुद्ध घड्याळ

ही निवडणूक सुरुवातीपासूनच भाजपच्या कमळ चिन्हावर लढणारे पराग संधान आणि राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढणारे काका कोयटे यांच्यातील थेट संघर्षात बदलली.

काका कोयटे : ७ प्रभागांतून १,५०८ मतांची आघाडी

पराग संधान : ८ प्रभागांतून १,९१७ मतांची निर्णायक आघाडी

यामध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटांतील धनुष्यबाण व मशाल चिन्हांवरील मतविभाजनाने पराग संधान यांना अप्रत्यक्ष फायदा झाला, तर अपक्ष व NOTA मतांचा प्रभाव मर्यादित राहिला.

कोपरगाव ग्रामीण भागातून प्रथमच नगरपालिकेत समाविष्ट झालेला ओम नगर–सह्याद्री नगर परिसर (प्रभाग १), तसेच लगतचा खडकी (प्रभाग २) आणि काही प्रमाणात (प्रभाग ३) या भागांत आमदार आशुतोष काळे यांनी मागील काही वर्षांत निधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे केल्याची छाप मतदारांवर होती.याच कामांचे राजकीय भांडवल मतमोजणीदरम्यान स्पष्ट झाले.

प्रभाग १ , २ व ३ मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार ६ पैकी ५ उमेद‌वार विजयी झाले.तर‌ प्रभाग १ मध्ये भाजप उमेदवार अवघ्या २४ मतांनी विजयी झाला.

प्रभाग ३  हा  पारंपरिकरित्या काका कोयटेंचा बालेकिल्ला मानला जातो.थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक असल्याने येथे काकांना ७०० ते ८०० मतांची आघाडी अपेक्षित होती. मात्र प्रत्यक्षात ही अपेक्षा पूर्ण झाली नाही.

यामागची कारण‌‌ मिमांसा काकांचा अचानक राष्ट्रवादीत प्रवेश,स्थानिक मतदारांमध्ये निर्माण झालेली नाराजी सुप्त विरोधी लाट कोल्हे गटाकडून सातत्याने मोठ्या निवडून येणाऱ्या जनार्दन कदम  यांची स्थानिक मजबूत  पकड देखील रोखू शकली नाही कदम यांना स्थानिक प्रश्नांची जाण, वैयक्तिक संपर्क आणि कामाची विश्वासार्हता यामुळे त्यांना यावेळी ऐतिहासिक मताधिक्य मिळाले.

आकडेवारी (प्रभाग ३):काका कोयटे : १,५३० मत,पराग संधान : १,२३२ मत‌ जनार्दन कदम यांना काकांपेक्षा ५०२ मतं अधिक मिळाली. तरी काकांनी २९८ मताची आघाडी घेतली जर हे ५०२ मध्ये मिळाले असती तर काकांची आघाडी ८०० मतांची झाली असती. यातून स्पष्ट झाले की मतदारांनी परंपरेपेक्षा कामगिरीला प्राधान्य दिले.

रेणुका कोल्हेंची रणनीतीने : सुप्त लाटेला दिशा दिली.काकांच्या अचानक निर्णयामुळे निर्माण झालेली मतदारांची नाराजी हेरून रेणुका कोल्हे यांनी थेट प्रभाग ३ मध्ये १० ते १५ दिवस मुक्काम ठोकला.घराघरांत जाऊन, विशेषतः महिलांशी वारंवार संवाद साधत त्यांनी मतदारांना विश्वास दिला.या प्रयत्नातूनच एक सुप्त पण प्रभावी लाट तयार झाली, ज्याचा परिणाम थेट मतपेटीत दिसून आला.

प्रभाग १५ : शेवटचा टर्निंग पॉईंट

निवडणुकीचा निर्णायक क्षण आला तो  आकडेवारी (प्रभाग १५):काका कोयटे : १,११२ मतं,पराग संधान : १,४०२ मत‌ आघाडी : २९० मतं येथे राष्ट्रवादीकडील प्रमुख संपर्कयंत्रणा (स्विय सहाय्यक) अनुपस्थित राहिल्याने काकांना अपेक्षित प्रभाव टाकता आला नाही. याउलट, पराग संधान यांनी शेवटच्या टप्प्यातील प्रचार अचूक साधत निर्णायक आघाडी घेतली.

शिवसेना मतविभाजनाचा परिणाम

धनुष्यबाण (शिंदे गट) : ३,६३६ मत

मशाल (उद्धव गट) : २,००१ मत हे मतविभाजन थेट पराग संधान यांच्या विजयासाठी पूरक ठरले.

वरील सर्व विचार करता नगराध्यक्षपदाची निवडणूक ही केवळ लोकप्रियतेवर जिंकता येत नाही.‌ प्रभागनिहाय रणनीती, स्थानिक नेतृत्व, अचानक निर्णयांचे परिणाम आणि अंतिम टप्प्यातील सक्रियता यावरच निकाल अवलंबून असतो, हे कोपरगावच्या निकालाने स्पष्ट केले.

४०९ मतांचा फरक आकड्यांमध्ये लहान वाटत असला, तरी प्रभाग ३ मधील फोल ठरलेले मताधिक्य, जनार्धन कदम यांची कामगिरी, सुप्त विरोधाची लाट आणि प्रभाग १५ मधील निर्णायक आघाडी या घटकांनी निकालाची दिशा ठरवली.

नगरपालिकेची लांबलेली साडेचार वर्षाची निवडणूक विधानसभेला पक्ष आदेशामुळे थांबावे लागले त्यामुळे विधानसभेनंतर स्थानिक सत्तेची चावी कोल्हे गटाकडे नसताना ही निवडणूक त्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची होती. या निकालाने कोपरगावच्या राजकारणात कोल्हे गटाला नवे बळ दिले असून, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा आणि भविष्यासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे असेच म्हणावे लागेल.

चौकट 

कोपरगाव नगरपालिकेची तब्बल साडेचार वर्षे उशिरा होणारी निवडणूक गेल्या नऊ वर्षापासून सर्व उमेदवारांनी घेतलेली मेहनत इच्छुकांची संख्या नाराजी नवखे उमेदवार या सर्वांचा परिपाक म्हणून होत असलेली निवडणूक दोन टप्प्यात झाल्याने अतिशय रोचक अटीतटीची झाली काय निर्णय लागेल याचा भल्याभल्यांना थांगपत्ता लागत नव्हता या निवडणुकीत सर्व अस्त्रशस्त्र याचा वारेमाप वापर करण्यात आला परंतु तरीही निकाल काय लागेल याची शास्वती कोणीही देऊ शकत नव्हते जेव्हा निकाल समोर आला त्यावेळेस मात्र प्रभाग तीन मध्ये काका कोयटे यांचा विजयाचा अश्व रोखण्याचे काम संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्ष रेणुका कोल्हे यांनी केले तर विजयावर अंतिम आणि निर्णायक मोहोर प्रभाग क्रमांक १५ चे नगरसेवक काळु आप्पा आव्हाड आणि त्यांच्या शिलेदार व मतदारांनी उमटविली  त्यामुळे यांना निर्णयाच्या विजयाचे शिलेदार म्हणता येईल 

विषय अटीतटीच्या टप्प्यावरून पडली

Leave a Reply

You cannot copy content of this page