महाराष्ट्र हॉकी संघात गौतम पब्लिक स्कूलची दमदार छाप!

महाराष्ट्र हॉकी संघात गौतम पब्लिक स्कूलची दमदार छाप!

Gautam Public School makes a strong impression in the Maharashtra hockey team!

राष्ट्रीय स्पर्धेत पाच खेळाडूंची निवड; कृष्णा सातपुतेकडे कर्णधारपदाची जबाबदारी

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनWed31 Dec 8.50Am.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव: दिनांक ५ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यान गौतम पब्लिक स्कूल, गौतम नगर येथे झालेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धांमधून महाराष्ट्राचा संघ घोषित करण्यात आला. या संघात गौतम पब्लिक स्कूलच्या पाच विद्यार्थ्यांची निवड होऊन शाळेच्या क्रीडा परंपरेत आणखी एक सुवर्णपान जोडले गेले.

दिनांक २२ ते २८ डिसेंबर २०२५ दरम्यान मध्यप्रदेशातील टिकमगड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाने दमदार कामगिरी केली. विशेष बाब म्हणजे गौतम पब्लिक स्कूलचा खेळाडू कुमार कृष्णा सातपुते याने महाराष्ट्र हॉकी संघाचा कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली. त्याच्यासह श्रेयश गाडेकर, प्रणव लोंढे, रणवीर नागलोट व लोकेश पाटील या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ दाखवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

महाराष्ट्र संघाने या राष्ट्रीय स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल गाठली. उपांत्यपूर्व सामन्यात ओडिसा संघाशी झालेल्या चुरशीच्या लढतीत महाराष्ट्राचा २–१ असा निसटता पराभव झाला.

या यशाबद्दल सर्व खेळाडू व हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे यांचे संस्थेचे चेअरमन मा. आ. अशोकराव काळे, विश्वस्त आ. आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव सौ. चैताली काळे, संस्था सदस्य, विश्वस्त, निरीक्षक नारायण बारे व प्राचार्य नूर शेख यांनी अभिनंदन केले.

प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभाग प्रमुख सुधाकर निलख, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, राजेंद्र आढाव व इसाक सय्यद यांचे खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

You cannot copy content of this page