कोपरगाव नगरपरिषद नवनिर्वाचितांची शपथ सोमवारी!

कोपरगाव नगरपरिषद नवनिर्वाचितांची शपथ सोमवारी!

The newly elected members of Kopargaon Municipal Council will take their oath on Monday!

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा; शहराच्या विकासाच्या नव्या पर्वाला प्रारंभ

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनSun4 Jan 20.10Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव :शहराच्या राजकीय व सामाजिक इतिहासात महत्त्वाची नोंद ठरणारा नगरपरिषद नवनिर्वाचित पदाधिकारी पदग्रहण व सेवा शपथ सोहळा सोमवार, दि. ५ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. तहसील मैदान, कोपरगाव येथे सायंकाळी ४.३० वाजता या भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्यात नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग शिवाजीराव संधान यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक सेवा शपथ घेऊन आपल्या कार्यकाळाची अधिकृत सुरुवात करणार आहेत. कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प या निमित्ताने व्यक्त केला जाणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे भूषवणार असून, मंचावर प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. बिपीनदादा कोल्हे, मा. आ. स्नेहलताताई कोल्हे तसेच युवानेते विवेकभैया कोल्हे यांची उपस्थिती लाभणार आहे.

हा पदग्रहण सोहळा केवळ शपथविधीपुरता मर्यादित न राहता, कोपरगाव शहराच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन तसेच नागरिकाभिमुख प्रशासन या विषयांना प्राधान्य देत आधुनिक, स्वच्छ व समृद्ध कोपरगाव घडवण्याचा संकल्प या सोहळ्यात अधोरेखित होणार आहे.

या ऐतिहासिक कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष, आजी-माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी, आघाडी व मित्रपक्ष, कोपरगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page