सुर, शिस्त आणि यश! संजीवनी सैनिकी स्कूलचा ब्रास बॅण्ड पश्चिम विभागात अव्वल, दिल्ली गाठली

सुर, शिस्त आणि यश! संजीवनी सैनिकी स्कूलचा ब्रास बॅण्ड पश्चिम विभागात अव्वल, दिल्ली गाठली

Rhythm, discipline, and success! Sanjeevani Military School’s brass band tops the Western region, reaches Delhi.

प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय स्पर्धेत संजीवनी सैनिकी स्कूलचे नेतृत्व

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनSun4 Jan 20.30Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव : शिस्त, ताल आणि सुरांच्या अचूक जुळवणीने संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या ब्रास बॅण्ड पथकाने पश्चिम विभागीय राष्ट्रीय भव्य ब्रास बॅण्ड स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत मानाचा तुरा खोवला. या यशासह संजीवनीचे पथक आता प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय ब्रास बॅण्ड स्पर्धेत पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व आणि नेतृत्व करणार आहे.

केंद्र सरकारच्या शैक्षणिक मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्यप्रदेश, राजस्थान, दादरा-नगर हवेली, दीव-दमण या राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील सर्वोत्तम १५ संघांमध्ये संजीवनीच्या बॅण्ड पथकाने शिस्तबद्ध, कलात्मक आणि प्रभावी सादरीकरण करत विजयी मोहर उमटवली.

सलग दुसऱ्या वर्षी राज्यपातळीवर अव्वल ठरल्यानंतर यंदा देशपातळीवरील पश्चिम विभागातही प्रथम क्रमांक पटकावत संजीवनीने आपली गुणवत्ता अधोरेखित केली. संगीत शिक्षक महेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दहावीतील विद्यार्थी विपुल दीपक वाघ यांच्या नेतृत्वात ३३ कलाकारांनी ही दमदार कामगिरी बजावली.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे, डायरेक्टर डी. एन. सांगळे, प्राचार्य कैलास दरेकर आणि कॅम्पस ॲडमिन विजय भास्कर यांनी पथकाचे अभिनंदन केले.

चौकट

सुमित कोल्हे (विश्वस्त) :“राष्ट्रीय पातळीवरील पश्चिम विभागातून प्रथम क्रमांक पटकावणारा संजीवनीचा संघ आता देशपातळीवरील राष्ट्रीय स्पर्धेत पश्चिम विभागाचे नेतृत्व करणार आहे. दिल्लीतील स्पर्धेसाठी पथकाचा कसून सराव सुरू आहे.”

Leave a Reply

You cannot copy content of this page