निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना कायमची काळी यादी; आशुतोष काळेचा कडक इशारा

निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना कायमची काळी यादी; आशुतोष काळेचा कडक इशारा

Contractors who perform substandard work will be permanently blacklisted; a stern warning from Ashutosh Kale.

नागरीकांच्या तक्रारी दुर्लक्षित केल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठसठशीत मांडणी

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनTue13 Jan 18.30Pm.By  सालकर राजेंद्र

 कोपरगाव : कोपरगाव मतदार संघातील पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत अनेक रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. यावर आमदार आ. आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर आयोजित आढावा बैठकीत ठेकेदार व संबंधित योजनेच्या अभियंत्यांना कडक इशारा दिला.

आमदार काळे म्हणाले, “कित्येक रस्त्यांचे भूमिपूजन झाले तरी काम सुरु झालेले नाही. काही रस्ते पूर्ण झाले आहेत तरी कामे निकृष्ट दर्जाची आहेत. काही महिन्यांतच रस्त्यांवर खड्डे पडत आहेत. नागरीकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास, मी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठसठशीत मांडणी करणार आहे. याचे परिणाम अधिकारी आणि ठेकेदार स्वतः भोगतील.”

बैठकीत आमदारांनी ठेकेदारांना तुरंत नोटीस देऊन काम सुधारण्याचे निर्देश दिले. सुधारणा न केल्यास ठेकेदारांना कायमची काळी यादी करण्यात येईल. तसेच सर्व रस्त्यांची स्वतः जाऊन नागरीकांसमवेत पाहणी करणे, सुरु असलेल्या टप्पा क्र. १ व २ ची कामे लवकर पूर्ण करणे, आणि तक्रारींचा अहवाल तयार करण्याचे निर्देशही दिले.

 यावेळी उपअभियंता संजयकुमार गायकवाड, कनिष्ठ अभियंते सलील शेख, अमित चोळके, कर्मवीर शंकरराव काळे, साखर कारखाना संचालक सूर्यभान कोळपे, सरपंच, माजी उपसरपंच, तसेच ठेकेदार व त्यांच्या प्रतिनिधी उपस्थित होते

आमदार काळे म्हणाले, “माझ्या चांगुलपणाचा कोणीही गैरफायदा घेऊ नये. माझी सहनशीलता संपली आहे. विकासासाठी निधी मिळवूनही काही अधिकारी व ठेकेदार बेजबाबदारपणे काम करतात; याचा त्रास नागरीकांना सहन करावा लागतो. नागरीकांनीसुद्धा जागरूक राहून मंजूर आराखड्यानुसार गुणवत्तापूर्ण कामे मिळवून घ्यावीत.”

आमदारांचे हे स्पष्ट इशारे ठेकेदारांसाठी सुचक आहेत. कोपरगाव मतदार संघातील रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ही बैठक आणि इशारे निर्णायक ठरणार आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page