कोपरगावकरांचा भरघोस प्रतिसाद, गोदाकाठ महोत्सवात सव्वा दोन कोटींचा उलाढाल!
With an overwhelming response from the people of Kopargaon, the Godavari riverbank festival witnessed a turnover of over two and a quarter crore rupees!
बचत गटाच्या महिलांनी कर्तृत्व, कौशल्य आणि आत्मसन्मान सिद्ध केला – महोत्सवाने महिला सक्षमीकरणाला नवा टप्पा दिला
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनTue13 Jan 18.40Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : राज्यभरातील महिला बचत गटाच्या उद्योजिकांनी गोदाकाठ महोत्सवात आपली उत्पादने विक्रीसाठी ठेवली आणि कोपरगावकरांनी पहिल्याच दिवसापासून भरघोस खरेदीस प्रतिसाद दिला. परिणामी चार दिवसांत जवळपास सव्वा दोन कोटींची आर्थिक उलाढाल झाली, असे महोत्सवाच्या यशाबाबत गौतम बँकेच्या माजी संचालिका आणि प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी सांगितले.
सौ. पुष्पाताई काळे म्हणाल्या, “महिला स्वावलंबी झाल्या तर कुटुंबाचा पाया मजबूत होतो आणि समाजाचा सर्वांगीण विकास साध्य होतो. गोदाकाठ महोत्सवाने महिलांना त्यांच्या कौशल्याला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. महिलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्वास हा या महोत्सवाचे खरे यश आहे.”
या वर्षी ३५० स्टॉल्स उभारले गेले तरी अनेक बचत गटाच्या महिलांना जागा मिळाली नाही. त्यामुळे पुढील वर्षी २०२७ साठीही स्टॉल्स बुकिंग यावर्षीच करण्यात आले, ज्यामुळे महिलांचा महोत्सवावर असलेला दृढ विश्वास सिद्ध झाला. महोत्सवात घरगुती उत्पादन, हस्तकला, खाद्यपदार्थ आणि स्वयंरोजगारावर आधारित विविध उत्पादने प्रदर्शित केली गेली.
मध्यमवर्गीय आणि ग्रामीण ग्राहकांना दर्जेदार, स्वदेशी आणि परवडणारी उत्पादने मिळाली. महोत्सवामुळे केवळ आर्थिक उलाढाल नाही तर विश्वास, गुणवत्ता आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला पाठबळ मिळाले. महिला उद्योजकांसाठी हा महोत्सव आत्मनिर्भरतेकडे नेणारा मजबूत टप्पा ठरला.
गोदाकाठ महोत्सव हे महिलांच्या कष्टांना मिळालेला सन्मान, स्वप्नांना मिळालेले आकाश असून स्थानिक उद्योजकतेला बळ देणारा उत्सव ठरला आहे. आयोजकांच्या नियोजनाने आणि सहभाग्यांच्या उत्साहामुळे हा महोत्सव दरवर्षी अधिक प्रभावीपणे यशस्वी होत असून, महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबनाचा प्रतीक म्हणून प्रज्वलित राहील.
Post Views:
19







