गौतम पॉलिटेक्निकचा पदविका निकाल ९७ टक्के ; अनुष्का बढे प्रथम

गौतम पॉलिटेक्निकचा पदविका निकाल ९७ टक्के ; अनुष्का बढे प्रथम

Gautam Polytechnic’s diploma results are 97 percent; Anushka Badhe secures first place.

हिवाळी परीक्षा २०२५ मध्ये प्रथम वर्षाचा ९९ टक्के, द्वितीय वर्षाचा ९६ टक्के तर तृतीय वर्षाचा ९८ टक्के निकाल

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनWed14 Jan 18.30Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव :महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा २०२५ च्या पदविका अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटने यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. महाविद्यालयाचा एकूण शेकडा निकाल ९७ टक्के इतका लागला आहे.

महाविद्यालयात कु. बढे अनुष्का किरण हिने ८९.७७ टक्के गुण मिळवून प्रथम, कु. घारे अपूर्वा दत्तात्रय हिने ८८.५९ टक्के गुणांसह द्वितीय, तर कु. गुडघे समृद्धी अनिल हिने ८७.४१ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.

प्रथम वर्षाचा एकूण निकाल ९९ टक्के लागला असून यामध्ये अनुष्का बढे प्रथम (८९.७७%), वाघडकर अभिजित नितीन द्वितीय (८५.०६%) तर पाचोरे सार्थक संजय तृतीय (७९.८८%) क्रमांकावर राहिले आहेत.

द्वितीय वर्षाचा निकाल ९६ टक्के लागला असून विविध विभागांतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

तृतीय वर्षाचा एकूण निकाल ९८ टक्के लागला असून सर्वच विभागांमध्ये गुणवत्तापूर्ण निकालाची नोंद झाली आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोकराव काळे, विश्वस्त व कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे, व्हा. चेअरमन छबुराव आव्हाड, मानद सचिव सौ. चैतालीताई काळे, सहसचिव सौ. स्नेहलताई शिंदे, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, इनस्पेक्टर प्रा. नारायण बारे, प्राचार्य वसिम शेख, कार्यालयीन अधीक्षक अण्णासाहेब बढे तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page