संजीवनीचा जपानला झेंडा; प्रसाद परजणेला ३२ लाखांचे पॅकेज-अमित कोल्हे 

संजीवनीचा जपानला झेंडा; प्रसाद परजणेला ३२ लाखांचे पॅकेज-अमित कोल्हे 

Sanjeevani hoists the flag in Japan; Prasad Parjane receives a package of 32 lakhs – Amit Kolhe

ग्रामीण शेतकरी कुटुंबातील तरुणाची आंतरराष्ट्रीय झेप 

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनTue20 Jan 16.50Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव : उद्योगपूरक शिक्षणाला परकीय भाषेची जोड मिळाली, तर ग्रामीण भागातील विद्यार्थीही थेट जागतिक व्यासपीठ गाठू शकतो, याचे जिवंत उदाहरण संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी प्रसाद बबनराव परजणे याने सिध्द करून दाखवले आहे. जपानमधील नामांकित एसएमसी कॉर्पोरेशन कंपनीने प्रसादची थेट ३२ लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजवर निवड केली असून, संजीवनीच्या जपानी भाषा प्रशिक्षणाचा हा थेट लाभ असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी विश्वस्त श्री. अमित कोल्हे यांनी दिली.

संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन (III) विभागामार्फत दिले जाणारे जपानी भाषा व संस्कृती प्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी करिअरचा टर्निंग पॉइंट ठरत आहे. एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या प्रसादने आंतरराष्ट्रीय कंपनीत घवघवीत यश संपादन करत संजीवनीच्या शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्कामोर्तब केले आहे.

श्री. अमित कोल्हे म्हणाले, “संजीवनी शैक्षणिक समूहाने दूरदृष्टी ठेवून जपानी भाषा प्रशिक्षणाचा उपक्रम सुरू केला. आजपर्यंत या माध्यमातून १५८ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना जपानमधील नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांना जागतिक व्यासपीठावर संधी मिळावी, हेच संस्थापक कै. शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न होते. ते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे.”

संस्थेचे अध्यक्ष श्री. नितीनदादा कोल्हे यांनी प्रसाद परजणे तसेच त्याच्या आई–वडिलांचे अभिनंदन केले. संस्थेच्या वतीने प्रसाद, वडील बबन परजणे आणि आई वैशाली परजणे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी इंजिनिअरिंग कॉलेजचे संचालक डॉ. एम. व्ही. नगरहल्ली, विभागप्रमुख डॉ. माधुरी जावळे, इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन विभागाचे डीन प्रा. अतुल मोकळ आदी उपस्थित होते.

चौकट : जपानची दारे उघडणारा ‘फास्ट ऑफर इंटरनॅशनल’ उपक्रम

संजीवनी इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन विभागामार्फत ए-टू-जे हिरामेकी इंडिया कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कंपनीच्या ‘फास्ट ऑफर इंटरनॅशनल’ उपक्रमांतर्गत प्रसाद परजणेला जपानमध्ये ३२ लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजवर नोकरीची संधी मिळाली. शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश संजीवनी शैक्षणिक संकुलाची गुणवत्ता व दूरदृष्टी अधोरेखित करणारे आहे.— श्री. अमित कोल्हे (कार्यकारी विश्वस्त, संजीवनी शैक्षणिक संकुल)

Leave a Reply

You cannot copy content of this page