नेटविन सिस्टिम्समध्ये चार अभियंत्यांची आकर्षक पॅकेजवर निवड
Four engineers have been selected at Netwin Systems with attractive packages.
संजीवनीतून थेट आयटी उद्योगात झेप!
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनWed21 Jan 17.00Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाने पुन्हा एकदा आपल्या कार्यक्षमतेची मोहोर उमटवली असून, नेटविन सिस्टिम अँड सॉफ्टवेअर या नामांकित कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हद्वारे चार विद्यार्थ्यांची आकर्षक वार्षिक पॅकेजवर निवड केली आहे. या यशामुळे संजीवनीची उद्योगस्नेही शिक्षणपरंपरा अधोरेखित झाली आहे.
कॉम्प्युटर इंजिनिअरींग विभागातील विरेंद्र संजय घुले व गोकुळ संजय रक्ताटे तसेच इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागातील अनिकेत रमेश बडाख व शंतनू प्रदीप होन यांची नेटविन सिस्टिम अँड सॉफ्टवेअर या बँकिंग व वित्तीय क्षेत्रासाठी सॉफ्टवेअर सोल्युशन्स व सेवा पुरविणाऱ्या कंपनीत निवड झाली आहे.
संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये उद्योगांच्या सध्याच्या गरजांनुसार अद्ययावत अभ्यासक्रम, नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार, तसेच संशोधनाभिमुख व उद्योगाशी थेट जोडलेले प्राध्यापक यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक समस्या सोडविण्याची क्षमता विकसित केली जाते. स्वतंत्र ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलमार्फत ऍप्टिट्यूड टेस्ट, संभाषण कौशल्य, तांत्रिक प्रशिक्षण, मुलाखतींचा सराव अशा नियोजनबद्ध प्रशिक्षणामुळे विद्यार्थी आत्मविश्वासाने उद्योगजगतात प्रवेश करत आहेत.
संजीवनीची शिस्तबद्ध परंपरा, सामाजिक बांधिलकी व सहअभ्यासक्रमीय उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, टीमवर्क व व्यावसायिक दृष्टिकोन विकसित होत असून, त्यामुळेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये संजीवनीच्या अभियंत्यांची मागणी सातत्याने वाढत आहे.
या यशाबद्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री. नितिनदादा कोल्हे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अमित कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. एम. व्ही. नागरहल्ली व विभागप्रमुख डॉ. माधुरी जावळे उपस्थित होते.
Post Views:
15





