शेतकऱ्यांनो “२४ जानेवारीपर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करा – आ. आशुतोष काळे”
Farmers, “Complete the e-crop survey by January 24th – MLA Ashutosh Kale”
“अचूक पीक नोंदणीशिवाय पीक विमा व अनुदान मिळण्यास अडचण”
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनWed21 Jan 19.00Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची ई-पीक पाहणी अद्याप पूर्ण न केलेली असल्यास, तातडीने ही पाहणी करण्याचे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.
‘माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा’ या संकल्पनेतून शासनाकडून शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी प्ले स्टोअरवर जाऊन अॅप डाउनलोड केल्यानंतर पिकांची माहिती स्वतः भरता येईल. या माध्यमातून शेतकऱ्यांचे पिक पेऱ्याची अचूक नोंद होईल, ज्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास वेळेत व योग्य मदत मिळू शकेल.
ई-पीक पाहणी न केल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना, अनुदान, आपत्तीसंबंधी आर्थिक मदत, पीकविमा व पीककर्ज यामध्ये अडचणी येऊ शकतात. मूळतः डीसीएस मोबाईल अॅपद्वारे ई-पीक पाहणीची मुदत १४ जानेवारीपर्यंत होती; मात्र काही शेतकऱ्यांनी अद्याप पाहणी पूर्ण केलेली नसल्याने ही मुदत २४ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
शेतकऱ्यांकडे मोबाईल नसेल किंवा वापर करता येत नसेल, तर तलाठी, कोतवाल किंवा गावातील कृषी सहाय्यकांची मदत घेऊन पिकांची नोंदणी करून घ्यावी. सात-बारावर पीक पेरा कोरा राहिल्यास नंतर भरता येणार नाही, ज्यामुळे पीक विमा, शासकीय अनुदान व इतर लाभ मिळवण्यात अडचणी येऊ शकतात.
आ. आशुतोष काळे यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, उर्वरित तीन दिवसांत रब्बी पिके व फळपिकांची नोंदणी करून ई-पीक पाहणी पूर्ण करावी, जेणेकरून सातबारावर अचूक नोंदणी होऊन आपत्तीच्या परिस्थितीत मदत मिळवता येईल.
Post Views:
9





